आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Children Death Due To Army's Bomb Blast In Uttar Pradesh

झांसीमध्‍ये बॉम्‍ब फुटल्‍याने दोन मुलांचा मृत्‍यू; 12 पेक्षा अधिक व्‍यक्‍ती जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झांसी - जिल्‍ह्यातील बबिना तालुक्‍यातील बैदौरा गावात आज (शनिवार) अचानक बॉम्‍बस्‍फोट झाला. यात दोन बालकांचा मृत्‍यू झाला तर 12 पेक्षा अधिक व्‍यक्‍ती गंभीर जखमी झाल्‍यात. सैन्‍य दलाचे जवान सरावाचा भाग म्‍हणून बॉम्‍ब सोडून गेले होते. मात्र, दोन मुलांना ते बॉम्‍ब सापडले. त्‍यांना ते भंगार व्‍यापाऱ्याला विकण्‍यासाठी घेऊन जात होते. दरम्‍यान, बॉम्‍ब फुटला आणि घटनास्‍थळावरच दोन मुलांचा मृत्‍यू झाला तर परिसरातील 12 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत.
सैन्‍य दलाचे दुर्लक्ष?
फायरिंगच्‍या सरावानंतर त्‍या ठिकाणी राहिलेल्‍या जिवंत बॉम्‍बकडे जवानांचे दुर्लक्ष झाल्‍याचे यातून समोर आले आहे. मात्र, या बाबत सैन्‍य दनलाकडून काहीही प्रतिक्रिया देण्‍यात आली नाही.