आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक सैनिकांनी कव्हर फायर करत भारतात घुसवले १५ दहशतवादी, १० जणांचा खात्मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
उरी/ श्रीनगर - उरीमध्ये शहीद झालेल्या सर्व वीरपुत्रांवर अजून अंत्यसंस्कारही झाले नाही तोच कव्हर फायरिंग करत पाकिस्तानने पुन्हा एकदा या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिरेकी घुसवले. भारतीय लष्कराने चोख उत्तर देत १० अतिरेक्यांचा खात्मा केला. दबा धरून बसलेले त्यांचे पाच साथीदार थांबून थांबून भारतीय सैनिकांवर गोळीबार करत होते. दुसरीकडे हंदवाडाच्या नौगाम सेक्टरमध्ये आणखी एक घुसखोरीचा प्रयत्न झाला. अतिरेक्यांनी ग्रेनेडने हल्ले केले. त्यात एक सैनिक शहीद झाला.

उरी हल्ल्याच्या ५८ तासांनंतर मंगळवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. २० मिनिटे चाललेल्या या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानचे हे कृत्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करण्यासाठी दबा धरून बसलेल्या १५ अतिरेक्यांच्या मदतीसाठी केलेली कव्हर फायरिंग होती. भारतीय सैन्याचे लक्ष विचलित करायचे होते. गोळीबार थांबताच काही भारतीय सैनिकांना लछीपूर परिसरात एलओसीवर संशयास्पद हालचाली दिसल्या. इशारा दिल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबाार सुरू केला. भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात गोळीबारात १० दहशतवादी ठार झाले.
पुढे पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...