आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Dead In Militant Attack In Jammu; Terrorists Killed, News In Divya Marathi

काश्मीरमध्ये ‘तोयबा’च्या दोन अतिरेक्यांचा खात्मा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - श्रीनगरमध्ये एका घरात दडून बसलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. कारवाईत दोन पोलिस जखमी झाले. अहमदनगर भागातील बुछपोरामध्ये चकमक उडाली. अतिरेक्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडील दोन एके रायफलींसह स्फोटके जप्त करण्यात आली.

एका घरात लपलेल्या दोन अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी सोमवारी सुरक्षा जवानांनी सुरू केलेली कारवाई 20 तास चालली. अतिरेक्यांनी रविवारी रात्री एका घरात प्रवेश केला तेव्हा घरमालक व त्याची पत्नी घरात होती.

अतिरेक्यांनी शरणागती पत्करण्याचे आवाहन धुडकावल्यानंतर गोळीबाराला सुरुवात झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली. स्थानिक रहिवासी अब्दुल माजिद रंगरेझ यांच्या घरी अतिरेक्यांनी आश्रय घेतला होता. अतिरेकी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शहरातील अहमदनगर भागात धाडसत्र आरंभिले. गोळीबाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक पोलिस जखमी झाला. जवानांनी संबंधित घराभोवती सुरक्षा कडे उभारले आणि शेजारची घरे रिकामी करण्यात आली. रंगरेझ आणि त्यांची पत्नी घरात असल्यामुळे काळजीपूर्वक कारवाई हाताळली जात होती.