आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी, पाऊस आणि वादळामुळे दोघांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोरदार पाऊस आणि वादळामुळे अनेक भागांतील शिकाऱ्यांचे नुकसान झाले आहे. - Divya Marathi
जोरदार पाऊस आणि वादळामुळे अनेक भागांतील शिकाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये झालेली हिमवृष्टी आणि वादळ तसेच पावसामुळे एका चिमुरड्यासह दोघांचा मृत्यू झाला आहे. डोडा रामबाणमध्ये 180 घरे वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. तर भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवे सलग चार दिवसांपासून बंद आहे. हायवेवर शेकडो गाड्या अडकलेल्या आहेत. लँडस्लाइडचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही हिमवृष्टी होत आहे. डोंगरी भागात हवामान बदलल्यामुळे पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली आहे. 

वीज पाण्याचा पुरवठा बंद 
- न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार जम्मू-काश्मीरमध्ये हवामानात झालेल्या बदलामुळे अनेक ठिकाणी वीज, पाण्याचा पुरवठा आणि कम्युनिकेशन पूर्णपणे ठप्प झाले आहे. 
- वादळामुळे डोडा रामबाणमध्ये 180 घरे वाहून गेली. 
- किश्तवाड जिल्ह्यात देवी गोले गावात वादळामुळे एका घरावर झाड कोसळले. त्यामुळे 11 वर्षाच्या एका लहान मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील इतर पाच जण जखमीही झाले आहेत. 
- खोऱ्यात यंदाची तिसरी सर्वात मोठी हिमवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात गुलमर्गमध्ये 1.5 फूट, अफवरटमध्ये 2.5 फूट, सोनमर्गमध्ये 2 फूट आणि महागुंस टॉपमध्ये 3 फुटांपर्यंत हिमवृष्टी झाली. 
- जम्मू-श्रीनगर नॅशनल हायवे राज्याला देशातील इतर भागांशी जोडतो. 
- सलग 4 दिवसांपासून बंद असल्याने या हायवेवर ठिकठिकाणी वाहने अडकलेली आहेत. 

गुलमर्गमध्ये -3.2 डिग्री 
- हवामान विभागाच्या माहितीनुसार गुलमर्गमध्ये शनिवारी आणि रविवारी जवळपास 1 फूट हिमवृष्टी झाली आहे. 
- गुलमर्गमध्ये रविवारी खोऱ्यातील सर्वात नीचांकी तापमान -3.4 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले. 
- कुपवाडामध्ये 8 इंच हिमवृष्टी आणि 6 सेंटीमीटर पाऊस झाला. याठिकाणी तापमान -0.7 एवढे नोंदवण्यात आले. 
- पहलगाममध्ये तापमान 0.2 डिग्री रेकॉर्ड करण्यात आले आहे. 4.8 सेंटीमीटर पावसासह मोठ्याप्रमाणावर हिमवृष्टीही झाली आहे. 
- काजीगुंड 8.2 सेमी आणि कोकडनागमध्ये 4.1 सेमी पावसासह हिमवृष्टी झाली. येथे -3.3 एवढे तापमान नोंदवण्यात आले. 
 
#हिमाचल प्रदेश
- दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील आदिवासी आणि उंच ठिकाणांवरील भागात किरकोळ हिमवृष्टी आणि इतर ठिकाणी पाऊस झाला. 
- हवामानात झालेल्या बदलामुळे राज्यातील बहुतांश भागात शीतलहर पसरली आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, जम्मू काश्मीरमधील काही निवडक PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...