आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Indian Armed Personnel Killed In Baramulla Attack

काश्मीरमध्ये चकमक : दोन जवान शहीद, ३ जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद आणि तीन जखमी झाले. दरम्यान, संबंधित दहशतवादी पळून गेल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांच्या मते, बारामुल्लातील कुंझेरमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने या भागात नाकाबंदी करून शोधमोहीम राबवली. दरम्यान, एका घराजवळ पोहोचताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात दोन जवान शहीद आणि एका नागरिकासह अन्य दोन जवान जखमी झाले. वृत्त लिहीपर्यंत शोधमोहीम सुरूच होती.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्त स्थितीचा फायदा घेऊन घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा मनसुबा आहे. या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला.