आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 ‘intruders’ Chased, Turned Out To Be Pigs At Pathankot Airbase

पठाणकोट : दहशतवादी समजून डुकरांवरच केली गेली अर्धा तास फायरिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट - येथील हवाई दलाच्‍या तळावर 4 जानेवारीच्‍या मध्‍यरात्री दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. मात्र, त्‍याला प्रत्‍त्‍युतर देताना सुरुवातीच्‍या अर्धा तास दोन रानटी डुकरांच्‍याच दिशेने भारतीय जवानांनी तब्‍बल अर्धा तास फायरिंग केल्‍याचे उघड झाले.
नेमके काय झाले ?
दहशतवाद्यांनी हल्‍ला केल्‍यानंतर एकच धावपळ उडाली. दरम्‍यान, थर्मल इमेजिंग डिव्हाइसमध्‍ये दोन इमेज दिसत होत्‍या. त्‍या आधारे हेलिकॉप्‍टरमध्‍ये बसून डिव्‍हाइसवर लक्ष ठेवून असलेल्‍या जवानांनी दोन दहशतवादी बेस हँगरकडे जात असल्‍याची माहिती दिली. नंतर त्‍या दिशेने अर्धा तास गोळीबार करण्‍यात आला. नंतर स्‍पष्‍ट झाले की, ते दहशतवादी नाही तर डुक्‍कर आहेत.
आर्मीने वॉर्निंग दिल्‍यानंतर फायरिंग...
- इंडियन एक्सप्रेसच्‍या वृत्‍तानुसार, थर्मल इमेजिंगच्‍या माध्‍यमातून माहिती मिळताच आर्मीने वॉर्निंग दिली.
- खूप वेळ फायरिंग करूनही पलीकडून काहीही उत्‍तर आले नाही. नंतरही फायरिंग सुरूच ठेवली.
- थांबून थांबून जवळपास अर्धा तास फायरिंग चाचली.
- दरम्‍यान, एयरफोर्सने लढाऊ हेलिकॉप्टरही तैनात केले होते.
- अर्धा तासानंतर घटनास्‍थळाची पाहणी केली. त्‍या ठिकाणी काहीही आढळले नाही.
- इमेजिंग डिव्‍हाइसमध्‍ये दिसलेल्‍या इमेज दहशतवाद्यांच्‍या नव्‍हे तर डुकरांच्‍या असल्‍याचे लक्षात आले. जे की जवळच्‍या कॉलोनीमधून एयरबेस एरियाकडे जात होते.