आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएफ-गावकर्‍यांत संघर्ष, 2 ठार, 10 नागरिक जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगरतळा - त्रिपुरातील दक्षिणेकडील रामनगर या गावात बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि गावकर्‍यांमध्ये झालेल्या संघर्षात एक जवान व एका गावकर्‍याचा मृत्यू झाला. त्यात 10 ग्रामस्थ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

भारत-बांगलादेश सरहद्द भागात गस्तीवर असलेल्या बीएसएफच्या पथकाला एक जण चोरी करून पळताना दिसून आला. जवानांनी पाठलाग करताच तो रामनगर गावात घुसला. जवानांना गावकर्‍यांनी विरोध केला व त्यांच्यावर हल्ला केला. त्यात एका बीएसएफ जवानाचा मृत्यू झाला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी जवानांनी गोळीबार केला. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी आहेत.

हल्ल्याच्या घटनेत संदीपकुमार हा जवान शहीद झाला. जखमी झालेल्या गावकर्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक बी. एस. रावत यांनी दिली. बीएसएफच्या कारवाईत ठार झालेल्या ग्रामस्थाचा भाऊ भानू मिआ याने बीएसएफने मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्याचा आरोप केला आहे.

न्यायालयीन चौकशीचे आदेश : त्रिपुरातील सरकारने शनिवारी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा न्यायाधीश अभिषेक सिंग यांनी पश्चिम त्रिपुरा भागाला शनिवारी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. चौकशीला सुरुवात झाली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर निष्कर्ष काढता येणार आहे. त्यानंतरच दोषींचा शोध घेता येईल, असे सिंग म्हणाले.

नेमके काय घडले
बीएसएफ जवान नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना शुक्रवारी रात्री एक जण चोरी करून पळत होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना तो रामनगरमध्ये घुसला. त्याचा पाठलाग करताना गावात आल्यानंतर गावकर्‍यांनी जवानांवर हल्लाबोल केला.

सुरक्षा वाढवली
रामनगरमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर गावात त्रिपुरा राज्य रायफल्सच्या जवानांची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. गावातील दोन किलोमीटर भागात गस्त घालण्यात येते.