आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासे पकडण्यासाठी टाकले होते जाळे, त्यात अडकले भलतेच काहीतरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जांजगीर (छत्तीसगड)- येथे एका तलवाता मासे पकडण्यासाठी गेलेल्या मसेमारांना दोन बाईक सापडल्या आहेत. मासेमारांनी टाकलेल्या जाळ्यात या बाईक अडकल्या होत्या. मासेमारांनी दोन्ही बाईक पोलीसांच्या ताब्यात दिल्या आहेत.

आधी वाटले मगर आहे...
- ही घटना जांजगीर जल्ह्यातील मुलमुला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथील काही मासेमारांनी मासे पकडण्यासाठी तलावात टाकालेले जाळे अचानक अडकले. एखादी मोठा मासा जाळ्यात अडकला असावा असे मारेमारांना सुरूवातीला वाटले. नंतर त्यांना मगर अडकली असल्याचा संशय आला.
- परंतु, त्यांनी धाडस करून जाळे खेचले तेव्हा त्यात एक नाही तर दोन बाईक अडकलेल्या त्यांना दिसल्या. एका बाईकची अवस्था ठिक होती, परंतु एक अतीशय खाराब झालेली होती.
- या प्रकराची तात्काळ पोलीसांना माहिती देण्यात आली. या बाईक चोरीच्या असल्याचा अदाज लावण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

फोटो : पवन शर्मा
पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...