आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लखनऊमध्ये आढळले स्वाइन फ्लूचे २ रुग्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशात राजधानी लखनऊमध्ये स्वाइन फ्लूचे आणखी दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. अशा रुग्णांची संख्या आता १९ झाली असून नव्या दोन रुग्णांपैकी एक संजय गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरचा जवळचा नातेवाईक आहे.

एकट्या संजय गांधी रुग्णालयातील स्वाईन फ्लूबाधित हा दहावा रुग्ण आहे. रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून सर्व कर्मचार्‍यांना प्रतिबंधक लस दिली आहे. अलमबाग परिसरातील मानकनगर येथील १६ वर्षाच्या एका मुलालाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा संशय आहे. सध्या या दोन्ही रुग्णांवर प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले असले तरी डॉक्टर या दोघांवरही लक्ष ठेवून आहेत. या रुग्णांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी एस .एन. एस. यादव यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी लष्करातील माजी सैनिकाच्या पत्नीचा स्वाईनमुळे मृत्यू झाला होता.