आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2 Pak Soldiers And Civilians Reportedly Killed Across LoC In India Retaliatory Fire

घुसखोरीचा डाव उधळला; तीन दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानी लष्कराकडून LoC वर गोळीबार सुरूच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - भारतीय जवानांनी सोमवारी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करून  नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरी करण्याचा डाव उधळून लावला. ही घटना उत्तर काश्मीरच्या नौगाम भागात घडली.  
 
लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नौगाम भागात रविवारी मध्यरात्रीनंतर एलओसीवर संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यानंतर सोमवारी पहाटेपर्यंत दहशतवाद्यांचा माग काढण्यात आला. त्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. ही कारवाई सुरूच होती. घुसखोरी करण्यात दहशतवाद्यांना यश येऊ नये म्हणून जंगलाच्या भागात तपास मोहीम हाती घेण्यात आली आहे.  
 
पाककडून भारतीय चौक्यांवर पुन्हा गोळीबार 
जम्मू -
पाकिस्तानी लष्कराने रविवारी रात्रभर पुंछ भागात एलओसीवरील गावे आणि लष्करी चौक्यांवर उखळी तोफा आणि लहान शस्त्रास्त्रांनी मारा केला. या हल्ल्यात एक व्यापार सुविधा केंद्र आणि पोलिस बराकींचे नुकसान झाले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने पुंछ जिल्ह्यात एलओसीवर रात्रभर जोरदार गोळीबार तसेच तोफांचा मारा केला. तो मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरूच होता. या तोफमाऱ्यात एक व्यापार सुविधा केंद्र आणि पोलिस बराकींचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानने रविवारीही लहान शस्त्रे, स्वयंचलित शस्त्रास्त्रे आणि उखळी तोफांनी पुंछ जिल्ह्यातील एलओसीवरील गावांवर आणि भारतीय चौक्यांवर हल्ला केला होता.  
 
गेल्या जून महिन्यात शस्त्रसंधी उल्लंघनाच्या २३ घटना, बॅट हल्ल्याची एक घटना आणि घुसखोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यात तीन सैनिकांसह ४ जण ठार तर १२ जण जखमी झाले होते. भारताने अनेकदा निषेध नोंदवूनही पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करतच आहे.
 
हेही वाचा...
बातम्या आणखी आहेत...