आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगर: सोपोरमध्ये चकमक, २ अतिरेक्यांचा खात्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- सोपोरमध्ये पोलिस आणि हिज्बुलच्या अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईत पोलिस अधीक्षक व पोलिस उपनिरीक्षक जखमी झाले.मारले गेलेले अतिरेकी या भागात सक्रिय होते.घातपात घडवण्याच्या उद्देशाने दोघे या परिसरात फिरत होते.

दोन अतिरेकी कारमधून सोपोरकडे जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांच्या एसओजी टीमने अमरगड भागात नाकाबंदी केली. पोलिसांचा फौजफाटा पाहून अतिरेक्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांनी नाक्यावर ग्रेनेड फेकले.
बातम्या आणखी आहेत...