आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल शोरूम लुटून पळणाऱ्या चोरट्यांना तरुणांनी लुटले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो) - Divya Marathi
(फाइल फोटो)
निमराना, अल्वर - निमराना औद्योगिक क्षेत्रातील एका मोबाइल शोरूम फोडून आठ लाख रुपये किमतीचे मोबाइल लुटून पळणाऱ्या दोन चोरट्यांना दिल्लीत कारमधून चाललेल्या तीन तरुणांनी लुटले. या तरुणांनी स्वत:ला पोलिस असल्याचे सांगितले आणि त्यांच्याकडील मोबाइल हिसकावून घेतले. 
 
नंतर या दोघांना कारमधून उतरवून दिले. पोलिसांनी या चोरांकडून मोबाइलची लूट करणाऱ्या तीन तरुणांना अटक केली आहे. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, या लुटीच्या मोबाइलपैकी अर्ध्याहून अधिक मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले.  
 
निमराना येथे दरोडा टाकल्यानंतर या दोन चोरट्यांनी गुरगाव येथे एका कारचालकास लिफ्ट मागितली, अशी माहिती या तरुणांनी दिली. ही घटना १५ जानेवारी रोजी घडली होती.  ती दीड महिन्यानंतर उघडकीस आली. निमराना येथे चोरी कोणी केली याची माहिती अद्याप पोलिसांना मिळू शकली नाही, ही आश्चर्यजनक बाब आहे. पकडण्यात आलेल्या अारोपींची नावे विक्की (२८), शमशाद (२८) आणि दिलशाद (२५)अशी आहेत. निमराना पोलिसांनी त्यांना काही दिवसांपूर्वी अटक केली. 

तिघांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना गुरुवारी तुरुंगात पाठवले. श्रीकृष्ण टॉवरमधील एसबी कम्युनिकेशन मोबाइल सेंटरमधून १५ जानेवारीच्या रात्री शोरूमची कुलपे तोडून अडीच लाख रुपये रोख आणि आठ लाखांचे मोबाइल चोरून नेले. गुरगाव येथील इफ्को चौकातून त्यांनी इंडिगो कारमध्ये एका कारचालकास लिफ्ट मागितली.
 
या कारमध्ये आधीच तीन तरुण बसलेेले होते. त्यांना पिशव्यांत भरलेले मोबाइल पाहून संशय आला. त्यांनी मोबाइलविषयी खरी माहिती सांगण्यासाठी त्या दोघांना दरडावले. कारमधील तरुणांनी त्यांना आम्ही पोलिस असल्याचे सांगितले. ते ऐकून ते २ चोरटे घाबरून कारमधून उतरले आणि पळून गेले. ३ आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबानुसार पोलिसांनी दिल्ली, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद येथील तीन ठिकाणी छापे मारून लाखो रुपयांचे मोबाइल हस्तगत केले.

सर्व्हिलन्सवर होते मोबाइल 
निमराना येथील घटनेत पोलिसांनी चोरीस गेलेले मोबाइल आयएमईआयच्या क्रमांकाच्या आधारे सर्व्हिलन्सवर ठेवण्यात आले होते. दिलशाद यांनी चोरीस गेलेल्या मोबाइलमध्ये सिमकार्ड टाकले तसे पोलिसांना त्याचे लोकेशन समजले. त्यानंतर या तिघांना त्यांनी अटक केली.  
बातम्या आणखी आहेत...