आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत दोन मंत्री निलंबित, मुलायम म्हणाले, मला काहीच माहीत नाही, अखिलेशचा हा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या शिफारशीवरुन राज्यपाल राम नाईक यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दोन मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती (भूमी खाणकाम) आणि राजकिशोर सिंह (पंचायत राज, लघु सिंचन, पशुसंवर्धन) यांची सोमवारी मंत्रिमंडाळातून हकालपट्टी केली.

प्रथम अवैध खाणकामातील आरोपीमंत्री गायत्री प्रसाद आणि त्यानंतर तासाभरानेच जमीन सिंचन मंत्री राजकिशोर सिंह यांना निलंबित करण्याचा निर्णय आला. अखिलेश यादव सरकारने हे पाऊल पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिमा स्वच्छ ठेवणे प्रतिमा उजळविण्याच्या हेतूने घेतला, असे मानले जात आहे.
सध्या अनुसूचित जाती तसेच जनजाती कल्याण मंत्रा राम गोविंद चौधरी यांना पंचायती राज विभाग आणि उद्यान, खाद्यान प्रक्रिया मंत्री मूलचंद चौहान यांना जमीन व खाणकाम खात्याचा अतिरिक्त प्रभार दिला आहे.

तीन लाख कोटी रुपयांपेक्षाही मोठा आहे खाण घोटाळा
मंत्र्यांच्या बरखास्तीवर प्रतिक्रिया देतांना भाजपाचे प्रदेश अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला वाचविण्यासाठी हे नाटक केले आहे. खाण घोटाळा तीन लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठा आहे. राज्य सरकारने तर यांची सीबीआय चौकशी थांबविण्याचेही प्रयत्न केले. पण न्यायालयाने त्यांचे ऐकले नाही. कॉंग्रेस नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी देखील अखिलेशच्या या निर्णयाला केवळ दिखावा असेच म्हटले आहे.
‘माझा याबाबत कोणताही सल्ला घेतला नाही’
दोन मंत्र्यांवरील बरखास्तीवर मुलायम सिंह यादव म्हणाले, मुख्यमंत्री यांनी माझा याबाबत कोणताही सल्ला घेतला नाही. हा त्यांचा विशेषाधिकार आहे. मला तर मीडियाच्या माध्यमातून कळाले. का हटविले हे देखील कळले नाही. हे दोघेच नव्हे तर सर्वच मंत्री आमचे आहेत. आम्हीच त्यांना मंत्री बनविले होते. मुख्यमंत्री तर नंतर अखिलेशला बनविले होते. जर ते दोघे भेटतील तर त्यांना जरुर भेटू कारण की ते भलेही मंत्री नसतील तरी आमचे आमदार तर आहेतच. गायत्री प्रसाद उप्रच्या अमेठी मतदारसंघातून आमदार आहेत. आणि सपा अध्यक्ष मुलायम सिंह व त्यांच्या कुटुंबाच्या जवळचे राहीलेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...