आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 20 Crore Survey Should Frighten Nobody, Says Telangana Government

तेलंगणातील सर्व्हे वादाच्या भोवर्‍यात, शासकीय सुटी जाहीर, चार लाख कर्मचारी व्यस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- तेलंगाणा राज्यात आज (मंगळवार) सुरु झालेला व्यापक सर्व्हे वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. तेलगंणात वास्तव्य करणार्‍या सीमांध्रमधील लोकांना केंद्रीत करण्‍यासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हा सर्व्हेचा घाट घातल्याचाही आरोप केला जात आहे. मात्र टीआरएस सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

राज्य व्यापी सर्व्हेच्या पार्श्वभूमीवर आज शासकीय सुटी जाहीर करण्यात आली आहे. सर्व सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालयांसह बाजार बंद ठेवण्यात आला आहे. एकूण चार लाख सरकारी कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या मदतीने राज्यातील 84 लाख पेक्षा जास्त लोकांची माहिती घरा-घरात जाऊन माहिती घेण्याचे काम सुरु झाले आहे.
शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचावा, हा या सर्व्हे मागील मूळ उद्देश असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी (17 ऑगस्ट) सांगितले होते. सर्व्हे यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री राव यांनी राज्यातील जनतेला आवाहनही केले आहे. सर्व्हेच्या कामात राज्यातील शिक्षण आणि पोलिस कर्मचार्‍यांची मदत घेण्यात येत आहे.

हैदराबादमध्ये नेहमी वर्दळ असणार्‍या रस्त्यांवर शुकशुकाट आहे. सर्व्हेच्या पार्श्वभूमीवर बहुतांश लोकांनी घरीच राहाणे पसंत केले आहे. विशेष म्हणजे मुंबई, सुरत (गुजरात) तसेच अन्य राज्यात कामानिमित्त गेलेल्या लोकांनाही सर्व्हेसाठी मायदेशात परत येण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

(फोटो: तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव)