आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात सापडले हजारो वर्षांपूर्वीच्‍या पुरुषांचे सांगाडे, नऊ एकरात स्‍मशान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खोदकामात सापडलेला एक सांगाडा. - Divya Marathi
खोदकामात सापडलेला एक सांगाडा.
नारनौंद (हरियाणा) - राज्‍यातील राखीगढी येथे पुरातत्‍व विभागाला चार पुरुषांचे सांगाडे मिळाले होते. ते पाच हजार वर्षांपूर्वीचे आहेत. दरम्‍यान, बुधवारी या परिसरात तब्‍बल नऊ एकरामध्‍ये प्राचीन स्‍मशानभूमी सापडली असून, आतापर्यंतच्‍या खोदकामात येथे 20 पेक्षा अधिक सांगाडे मिळाले आहेत. त्‍यामुळे हरियाणातील प्राचीन संस्‍कृतीचा उलगडा होण्‍यास मदत होणार आहे.
दक्षिण कोरियाचे पथक करतेय संशोधन
> हरियाणा सरकारचा पुरातत्त्व आणि संग्रहालये विभाग, पुणे येथील डेकन कॉलेज आणि दक्षिण कोरियातील सियोल नॅशनल यूनिव्‍हर्सिटीचे एक पथक या 20 सांगाड्यांचा अभ्‍यास करत आहे. ते त्‍याची डीएनए तपासणी करणार आहेत.
> या संशोधनामुळे हडप्पा संस्‍कृतीच्‍या काळातील जनजीवन समोर येणार असून, अनेक प्रश्‍नांची उत्‍तरे मिळणार आहेत.
> सुरुवातीला ज्‍या ठिकाणी दोन सांगाडे मिळाले होते त्‍या ठिकाणी खोदकाम करताना तब्‍बल नऊ एकराच्‍या विस्‍तीर्ण परिसरात स्‍मशानभूमी आढळली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अशी होती अंत्‍यसंस्‍काराची पद्धत.... डीएनएतून होणार खुलासा