आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमच युद्धात सीमेवर मदत करणार 20 महिला अधिकारी ; सीमेवर करत आहेत पाहणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम सीमेवरून - सीमेवर गस्त घालणाऱ्या आणि लढाऊ विमाने उडवणाऱ्या महिला युद्धाच्या काळात आघाडीवरही तैनात करण्यात येतील. त्याची तयारी सध्या पाकिस्तानला लागून असलेल्या शाहगड येथे सुरू आहे. २० महिला अधिकारी काही पुरुष अधिकाऱ्यांसोबत सीमेची पाहणी करत आहेत. कधी पायी, तर कधी थकल्यानंतर उंटावर. ऑपरेशनल तयारीचीही पाहणी त्या करत आहेत. भारत प्रथमच जैसलमेरला लागून असलेल्या पाकिस्तान सीमेवर बीएसएफ आणि वायुदलाच्या महिला शक्तीची संयुक्त ताकद दाखवत आहे.  

बॉर्डर इंटेग्रिटी प्लॅनअंतर्गत प्रथमच बीएसएफसोबत वायुदलाच्या धडाडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण पश्चिम सीमेची माहिती दिली जात आहे. युद्धात गरज भासल्यास लष्कराला थेट ग्राउंड सपोर्ट देता यावा हा उद्देश. बीएसएफचे प्रवक्ता डीआयजी रवी गांधी यांनी सांगितले की, कॉम्बॅट रोलमध्ये आल्यानंतर दोन्हीही दलांच्या महिला अधिकाऱ्यांसाठी हा सराव खूप फायदेशीर ठरेल. उंटावर स्वार असलेल्या महिलांच्या गटात दोन्ही दलांच्या प्रत्येकी १० महिला अधिकारी असतील. त्यात बीएसएफचे नेतृत्व पहिल्या महिला कॉम्बॅट अधिकारी असिस्टंट कमांडंट तनुश्री पारिक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत पाच उपनिरीक्षक आणि चार महिला काॅन्स्टेबल यांचा समावेश आहे. वायुदलाच्या दहा महिला अधिकारी त्यात असतील. त्यात वैमानिक ते प्रत्येक प्रकारची ड्यूटी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.  

युद्धकाळात बीएसएफच्या तुकड्याच विशेषत्वाने लष्कराला ग्राउंड सपोर्ट देतात. त्यामुळेच बीएसएफच्या महिला अधिकाऱ्यांची तयारी करवून घेतली जात आहे. त्याचबरोबर वायुदलाचाही समावेश म्हणजे संयुक्त कारवाईचा सरावच आहे. २ ऑक्टोबरला या महिला अधिकारी वाघा सीमेवरील बीटिंग द रिट्रीट समारंभात सहभागी होतील. त्यातून पाकिस्तानला थेट संदेश देण्याचाही प्रयत्न आहे. 
बातम्या आणखी आहेत...