आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ 20 वर्षांच्या तरुणीने घेतली दिक्षा, झाली साध्वी, मिरवणुकीवर नोटांचा पाऊस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल्वर (राजस्थान)- पंजाबमधील बठिंडा शहरातील 20 वर्षांची पायल गृहस्थ जीवन सोडून साध्वी झाली. सूर्यनगरातील श्री पार्श्व-पद्मावती मंदिरात झालेल्या सोहळ्यात तिने वैराग्याची दिक्षा घेतली. यापूर्वी नववधूसारखे सजवून तिची शहरात रथावर मिरवणूक काढण्यात आली होती. त्याला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी लोकांनी पायलवर नोटांचा पाऊस पाडला.
दिक्षा देण्यापूर्वी आचार्यांनी विचारला हा प्रश्न
- पायलच्या नातलगांसह पंजाब, हरियाणा, हैदराबाद, दिल्लीसह अनेक राज्यांमधून भाविक या ठिकाणी आले होते.
- पायलला नववधूसारखे सजविण्यात आले होते. यावेळी तिची धर्मयात्रा काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर नोटा आणि सिक्के उधळले.
- आचार्यश्री विजय मुनीजी यांनी पायलला दिक्षा देण्यापूर्वी सांगितले, की वैराग्याचा मार्ग कठिण आहे. त्यावर चालणे म्हणजे तारेवरची कसरत असते.
- तुला जर गृहस्थ जीवन जगायचे असेल तर आताही माघार घेऊ शकतेस. पण एकदा का दिक्षा घेतली की परत फिरता येणार नाही.
बहिणीने हटवला श्रृंगार
- पायलने भजनच्या माध्यमातून दिक्षा घेण्याची इच्छा जाहीर केली. तिला सांसारीक बंधनांमधून मुक्त व्हायचे होते.
- त्यानंतर दिक्षार्थी पायलचा श्रृंगार तिच्या बहिणीने दूर केला. तिला पांढरे वस्त्र परिधान करण्यात आले.
- आचार्यश्री यांनी पायलला दिक्षा दिली. यावेळी आचार्य म्हणाले, की भक्तीचा रंग असा असतो की त्यावर कोणताही रंग चढत नाही.
पुढील स्लाईडवर बघा, पायलची मिरवणूक काढण्यात आली तेव्हाचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...