आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 200 Kanadi MLA A Billionair ; Election Watch Survey

200 कानडी आमदार कोट्यधीश ; इलेक्शन वॉच संस्थेची पाहणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - निवडणुकीमुळे देशाचे लक्ष वेधणा-या कर्नाटक राज्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नवनिर्वाचित आमदारांमध्ये सुमारे 200 जण कोट्यधीश असल्याची माहिती उजेडात आली आहे. कर्नाटक इलेक्शन वॉच (केईडब्ल्यू) या संस्थेच्या वतीने राज्यातील निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. त्यात नवनिर्वाचित 223 आमदारांच्या संपत्तीची माहिती गोळा करण्यात आली. त्यानुसार 218 पैकी 203 आमदारांकडे कोट्यवधींची माया असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडून आलेल्यांपैकी 92 टक्के आमदारांच्या संपत्तीचे विश्लेषण करण्यात आले. 223 पैकी 218 आमदारांनी दिलेल्या शपथपत्रातून ही माहिती मिळाली आहे, असा दावा केईडब्ल्यूकडून करण्यात आला आहे. 218 पैकी 74 आमदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यातील 39 जणांवर तर हत्या, अपहरण, दरोडेखोरी, महिलांचा अवमानासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 11 आमदारांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवनिर्वाचित आमदारांमध्ये पाच महिला आमदार आहेत.


92 आमदारांची पाच वर्षांत दामदुप्पट कमाई
135 टक्के वाढ
2008 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी निवडून आलेल्या आमदारांची संपत्ती 135 टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून आले आहे.


सरासरी किती ?
गेल्या निवडणुकीत आमदारांची संपत्ती सरासरी 10.02 कोटी रुपये एवढी दाखवण्यात आली होती. या वेळी प्रत्येकी सरासरी 23.54 कोटी रुपये असल्याचे दिसून आले आहे.


पुन्हा लॉटरी किती जणांना ?
कर्नाटकमध्ये 2008 ला निवडून आलेले 92 आमदार 2013 च्या निवडणुकीतही विजयी झाले आहेत. त्यांचे सरासरी उत्पन्न 17.53 कोटी होते. ते सरासरी 30.15 कोटींवर पोहोचले आहे. अर्थात त्यात 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


100 कोटींची वाढ
गेल्या पाच वर्षांत संपत्तीत वाढ झालेल्यांमध्ये काँग्रेसच्या आमदारांचा अधिक भरणा आहे. डी.के. शिवकुमार (काँग्रेस) यांच्या संपत्तीत सुमारे 100 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.


संपत्ती वाढली अशी
आमदाराचे नाव 2008 2013
डी.के. शिवकुमार (काँग्रेस) 75.5 कोटी 175.9 कोटी
प्रियकृष्णन (काँग्रेस) 767.6 कोटी 910.9 कोटी
संतोष लाड (काँग्रेस)) 61.5 कोटी 186.4 कोटी