आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक: भाजपच्या 200 महिला कार्यकर्त्यांची 12 मतदारसंघांमध्ये दुचाकी फेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- शहरातील सर्व १२ विधानसभा मतदारसंघांत भाजप महिला माेर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या नेतृत्वाखाली २०० महिला कार्यकर्त्यांनी दुचाकी फेरी काढली. विविध मार्गांनी जाऊन कार्यालयात परतली. 

 

हेल्मेटविना फेरी 

महिला माेर्चाच्या कार्यकर्त्यांनी हेल्मेट न घालताच दुचाकी चालवल्या.सामान्य लाेक हेल्मेटविना दुचाकी चालवतात तेव्हा पाेलिस दंड वसूल करतात, परंतु फेरीतील काेणावरही कारवाई करण्यात अाली नाही. 

 

लाल दरवाजात सभा

पश्चिम, पूर्व वराछा, उत्तर, कतारगाम, कामरेज अाणि करंजामध्ये भाजपच्या महिलांनी फेरी काढली. लाल दरवाजा येथे सभेनंतर फेरीची सांगता झाली. फेरीत विजया रहाटकर यांच्यासह ज्याेती पंड्या अाणि सुरतच्या महापाैर अश्मिता शिराेया अाणि महिला सामील झाल्या हाेत्या.

बातम्या आणखी आहेत...