आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • '21 Crore People In UP, Yet Lowest Number Of Rapes': Mulayam Singh

21 कोटी लोकसंख्येच्या तुलनेत बलात्कार कमीच!, मुलायम सिंहांचा नवा तर्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी युपीच्या कायदेव्यवस्थेबाबत आणखी नवे वाद ओढवून घेणारे वक्तव्य केले. मुलगा अखिलेश यादव यांच्या सरकारची बाजू त्यांनी घेतली. 'उत्तरप्रदेशची लोकसंख्या 21 कोटी आहे, मात्र त्या तुलनेत येथे होणा-या बलात्करांची संख्या कमीच आहे.' अशा भब्दांत मुलायमसिंह यांनी राज्यातील परिस्थिती आलबेल असल्याचे वक्तव्य केले आहे.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुलायम यांनी हे वक्तव्य केले. याआधीही मुलायम सिंह यांनी (एप्रिल 2014) वादग्रस्त वक्तव्य केले होते. मुलांकडून अशा चुका होतच असतात, असे वक्तव्य ते म्हणाले होते.
वक्तव्याचे पडसाद
मुलायम यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी लगेचच या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते शोभा ओझा म्हणाले की, 'मुलायम यांचे वक्तव्य अत्यंत असंवेदनशीलतेचे प्रतिक आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढण्यास मदत मिळू शकेल, असेही ते म्हणाले. तर रशीद अल्वी यांनी अशा प्रकारच्या वाढत्या घटना राज्य सरकारसाठी लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य शमीना शरीफ यांनीही मुलायम यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. उत्तर प्रदेशच्या नेत्यांकडे काहीही काम नाही. त्यामुळे त्यांनी रोज सकाळी वर्तमान पत्रात राज्यात रोज होणा-या अशा घटनांचीच माहिती वाचावी, असे त्या म्हणाल्या.
फाइल फोटो:सपा प्रमुख मुलायम सिंह यादव