आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशा: 50 फूट खोल कोसळली बस, सायकलस्वाराला वाचवताना अपघात, 21 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी एका पुलावरुन बस 50 फूट खोल कोसळली. अपघातात 21 जण दगावले आहेत. पुलावरुन एक मुलगा सायकलवर चालला होता, त्याला वाचवताना बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस खाली कोसळली.
- वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बौद्ध जिल्ह्याहून अंगुल जिल्ह्यातील अथमाल्लिक येथे जाणारी ही बस 10 वर्षे जुनी होती अशी माहिती आहे.
- प्रत्यक्षदर्शी अरुण बेहरा यांनी सांगितले, 'बस जुन्या मानित्री पुलावरुन जात होती, तेव्हा ही दुर्घटना घडली.'
- बसचालक मोबाइलवर बोलत होता, त्याचवेळी समोरुन एक मुलगा सायकलवर येत होता. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटला आणि बस रेलिंग तोडून खाली कोसळली.
- जखमींना अंगुल येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
- मृतांमध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 14 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर 7 जणांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
- जिल्हाधिकारी अनिल सैमल यांनी सांगितले, की बसचे अपघातात मोठे नुकसान झाले आहे. सर्व जखमींना बाहेर काढण्यात आले आहे.
ओडिशामध्ये दुसरा मोठा बस अपघात
- ओडिशामध्ये या वर्षात झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे. याआधी एप्रिलमध्ये देवगड येथे एक बस 300 फूट खोल दरीत कोसळली होती.
- या अपघातात 27 यात्रेकरुंचा मृत्यू झाला होता.
- प्रवाशांनी आरोप केला होता, की ड्रायव्हर नशेत होता. अपघातापूर्वी त्याचे बस मालकाशी भांडणही झाले होते.
बातम्या आणखी आहेत...