आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडच्या उत्तराकाशीमध्ये भागीरथी नदीत बस कोसळली, इंदूरचे 21 जण ठार, 3 बेपत्‍ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नदीच्‍या वेगवान प्रवाहामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. - Divya Marathi
नदीच्‍या वेगवान प्रवाहामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.
उत्तरकाशी - इंदूरच्या भाविकांना गंगोत्रीहून परत घेऊन येणारी एक बस महामार्गावर भागीरथी नदीत कोसळून 21 भाविकांचा मृत्यू झाला. सातहून अधिक जखमी आहेत. तीन भाविक बेपत्ता आहेत.

गंगोत्रीचे दर्शन घेऊन मंगळवारी सकाळी परतताना नालूपानीजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि 31 प्रवासी असलेली बस 300 मीटर दरीत भागीरथी नदीत कोसळली. धोकादायक वळणावर हा अपघात झाला. बसचालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचे उत्तराखंड सरकारच्या माहिती अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...