आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदमान निकोबार बेटाजवळ प्रवासी बोट बुडाली, महाराष्ट्रातील तिघांसह 21 जणांना जलसमाधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंदमान निकोबार बेटाजवळील 'नॉर्थ बे' येथे प्रवासी बोट बुडाली. बोटीमध्‍ये एकूण 46 प्रवासी होते. 21 प्रवाश्‍यांना या दुर्घटनेत जलसमाधी मिळाली. तर 17 प्रवाशांना वाचविण्‍यात यश आले आहे. अपघातातून बचावलेल्‍या प्रवाशांना रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले असून त्‍यांच्‍यावर उपचार सुरु आहेत. सर्व प्रवासी 'वॉटर स्‍पोर्ट' झाल्‍यानंतर एका 'एक्‍वा मरीन' या खासगी बोटीने परतत होते. पोर्ट ब्‍लेअर जवळ 'एक्‍वा मरीन' ही बोट प्रवाशांना घेऊन जात होती. बोटीमध्‍ये पाणी शिरल्‍याने ही बोट बुडाल्‍याचे सांगण्‍यात येते.

मृतांमध्ये ठाणे जिल्ह्यातील चंद्रकांत भोसेकर आणि अलका भोसकर यांचा, तर मुंबईतील लालजी सिंह यांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडुतील 15 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. केरळ मधीलही काही प्रवाशी असण्याची शक्‍यता वर्तविण्‍यात आली आहे. नेव्‍ही आणि कोस्‍ट गार्डच्या जवानांना बचावकार्य केले.

या अपघातातील मृत व्‍यक्‍तींच्‍या माहितीसाठी (1070 आणि 03192-240127) हा हेल्‍पलाईन क्रमांक आहे. अंदमान आणि निकोबार बेटाचे उप-राज्‍यपाल ए.के. सिंग यांनी सांगितले, की 13 प्रवाशांना वाचविण्‍यात यश आले आहे. त्‍याचबरोबर प्रत्‍येक मृत व्‍यक्‍तींच्‍या परिवाराला एक-एक लाख रुपये देण्‍याची घोषणा केली आहे.