आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2126 मध्‍ये जगबुडी होऊ शकते, जयंत नारळीकर यांनी वर्तवली शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - जर शास्त्रज्ञांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला आणि वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास 14 ऑगस्ट 2126 ला जगबुडी होऊ शकते. अंतराळातून येणारे धूमकेतू पृथ्वीवर आदळतील. त्यामुळे पृथ्वी नष्ट होण्याचा धोका आहे, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रो. जयंत नारळीकर यांनी रायपूर पं. रविशंकर शुक्ल विद्यापीठातर्फे आयोजित पाचदिवसीय इन्स्पायर कॅम्पच्या उद्घाटन समारंभानंतर ‘स्ट्रेंज इव्हेंट इन आवर सोलर सिस्टिम’ या विषयावर प्रो. नारळीकर यांनी व्याख्यान दिले. त्यात बोलताना प्रो. नारळीकर यांनी वरील शक्यता वर्तवली. त्यांच्या म्हणण्यानुसार 14 ऑगस्ट 2126 रोजी पृथ्वीवर एक मोठा धूमकेतू आदळण्याचा धोका आहे. त्या धडकेतून निर्माण होणा-या प्रचंड उष्णतेमुळे पृथ्वीवरील प्राणवायू (ऑक्सिजन) संपुष्टात येईल. हा धूमकेतू पृथ्वीपासून अगदी जवळ असल्याचे ते म्हणाले. परंतु वेळीच प्रयत्न केले तर धूमकेतू आणि पृथ्वीची टक्कर टाळता येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले,‘पृथ्वीवर 50 हजार वर्षांपूर्वी धूमकेतूचा एक तुकडा औरंगाबादनजीक पडला होता. त्यापासून तयार झालेले सरोवर लोणार येथे आजही अस्तित्वात आहे. त्याआधी अमेरिकेमध्येही धूमकेतू कोसळला होता.
धडक टाळण्यासाठी प्रयत्न हवेत
धूमकेतूच्या तुकड्यांमध्ये प्रचंड उष्णता असते. ते पृथ्वीवर आदळल्यानंतर तेथील प्राणवायू नष्ट होण्याचा धोका असतो. तसे झाल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टी जिवंत राहणे जवळजवळ अशक्यच असते. ही टक्कर टाळण्यासाठीही व्यापक प्रयत्न व्हायला हवेत, ’ असेही नारळीकर यांनी स्पष्ट केले.