आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे आहे तरुण अधिकार्‍यांच्या हातात प्रशासन, 22 जिल्हाधिकारी चाळीशीतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले प्रशासकीय अधिकारी. - Divya Marathi
परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले प्रशासकीय अधिकारी.
जयपूर (राजस्थान) - ललित मोदी प्रकरणामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे वादात अडकल्या आहेत. मात्र याचा त्यांच्या राज्यावर फारसा परिणाम झालेला नाही. राजस्थानमधील प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे आणि प्रशासन गतिमान असावे यासाठी त्यांनी राज्यात तरुण प्रशासकीय अधिकाऱ्यांची फळीच उभी केली आहे. चाळीशीच्या आतील अनेक जिल्हाधिकारी राजस्थानमध्ये कार्यरत असून ते नवनव्या योजना आपल्या कार्यक्षेत्रात राबवत आहेत.
राज्यात नुकत्याच झालेल्या एका परिषदेत 33 जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात यशस्वी राबवलेल्या रस्ते, वीज आणि पाणी या सुविधांचे सादरीकरण केले. सीकरचे जिल्हाधिकारी एल.एन. सोनी यांच्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले. सोनींनी सांगितले, की ते सकाळी सहा वाजता अधिकाऱ्यांना गोपनीय कामगिरी देऊन सरप्राइज चेकिंग करायला सांगतात. ते म्हणाले, मी रात्री झोपतानाच विचार करुन ठेवतो की, सकाळी कोणत्या विभागाची चौकशी करायची. जर जिल्ह्यातील अंगणवाड्यांची चौकशी करायची असेल तर व्हॉट्सअॅपवर तशी तयारी आधीच करुन ठेवतो. कोणत्या केंद्रावर कोणते अधिकारी जातील, बीडीओ कुठे असतील, एसडीओ कोणत्या अंगणवाडीला भेट देतील याचा निरोप सकाळी पाठवतो. व्हॉटस्अॅपवर अचानक मॅसेज आल्यामुळे कोणालाही त्याची आगाऊ माहिती मिळत नाही, आणि कोणालाही आपल्या आवडीच्या ठिकाणी जाता येत नाही.
तरुणांच्या हातात जिल्हाचा कारभार
जिल्हाथिकारी आणि पोलिस आयुक्तांच्या या परिषदेत यावेळी युवा अधिकाऱ्यांचा दबदबा राहिला. परिषदेत सहभागी 32 जिल्हाधिकाऱ्यांमध्ये 22 चाळीशीच्या आतील होते. त्यात बांसवाडाचे जिल्हाधिकारी प्रकाश राजपुरोहित (28 वर्षे) सर्वात तरुण अधिकारी होते. बूंदीच्या नेहा गिरी (29 वर्षे) आणि डूंगरपूरचे जिल्हाधिकारी इंद्रजितसिंह 30 वर्षांचे आहेत. 32 पैकी फक्त दहा जिल्हाधिकारी हे 50 ते 60 वर्षे वयोगटातील होते.

आठ महिला जिल्हाधिकारी >> परिषदेत अजमेरच्या जिल्हाधिकारी आरुषि ए मलिक, बीकानेरच्या पूनम, सवाईमाधोपुरच्या आनंधी, भीलवाडाच्या टीना कुमार, धौलपुरच्या सुचि त्यागी, चूरूच्या अर्चना सिंह, बूंदीच्या नेहा गिरी आणि टोंक येथील रेखा गुप्ता सहभागी झाल्या होत्या.
पुढील स्लाइडमध्ये, असे झाले प्रेझेंटेशन आणि मुख्यमंत्री राजेंनी अधिकाऱ्यांना काय सूचना केल्या.