आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांचीतून 22 जिवंत बॉम्‍ब जप्‍त, ऐन दिवाळीत मोठ्या घातपाताचा होता कट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- पाटण्यामध्ये गांधी मैदानावर भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्‍या सभेदरम्‍यान झालेल्या साखळी स्फोटांना आठवडा होत नाही, तोच पोलिसांनी रांची शहरातून तब्‍बल 22 जिवंत बॉम्‍ब जप्‍त केले आहेत. राष्‍ट्रीय तपास संस्‍था (एनआयए) आणि झारखंड पोलिसांनी एका हॉटेलमध्‍ये छापा मारुन ही कारवाई केली. पाटणा बॉम्‍बस्‍फोटातील एक मुख्‍य आरोपी हैदर अली या हॉटेलमध्‍ये थांबल्‍याची गोपनीय माहिती मिळाली होती. या हॉटेलमध्‍ये हैदर अलीने पाटणा बॉम्‍बस्‍फोटांच्‍या काही तासांपूर्वीच खोली बूक केली होती. ऐन दिवाळीत मोठा घातपात घडविण्‍याचा इंडियन मुजाहिदीनचा कट होता.

पोलिसांना जिवंत बॉम्‍बशिवाय 19 डेटोनेटर्स, जिलेटीनच्‍या कांड्याही सापडल्‍या आहेत. याप्रकरणी दोघांची चौकशी सुरु आहे. ऐन दिवाळी सुरु असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात स्‍फोटके सापडल्‍यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्‍हणजे, पाटण्‍यात वापरण्‍यात आलेल्‍या बॉम्‍बप्रमाणेच हे बॉम्‍ब आहेत. इंडियन मुजाहिदीनच्‍या रांची शाखेने पाटणा स्‍फोटांचा कट आखला होता. त्‍यामुळे तपास यंत्रणांची तीक्ष्‍ण नजर रांचीवर होती.