आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड-बंगळुरू एक्स्प्रेसच्या एसी डब्याला लागलेल्या आगीत 26 जण ठार, तर15 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनंतपूर - बंगळुरू-नांदेड एक्स्प्रेस रेल्वेच्या एसी डब्याला शनिवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यात आग लागली. यात 26 प्रवाशांचा जळून कोळसा झाला. 15 जण जखमी झाले असून, त्यांना पुट्टपर्थी आणि धर्मावरमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रवासी साखरझोपेत असतानाच पहाटे 3.30 वाजता कर्नाटक सीमेवर कोथाचेरुवू स्थानकावर 65 प्रवासी असलेल्या बी-1 डब्याला आग लागली. ती लगतच्या डब्यांतही पसरली. काहींनी धावत्या रेल्वेतून उड्या घेतल्या. चेन ओढल्यानंतर रेल्वे थांबली. मृतदेह बंगळुरूला पाठवण्यात आले असून, डीएनए चाचणीनंतर ते नातलगांना सुपूर्द केले जातील. शॉर्टसर्किट किंवा डब्यात ज्वलनशील पदार्थ असावा. त्यामुळे आग लागली असेल, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्रकुमार यांनी सांगितले. मृतांच्या वारसांना पाच, तर जखमींना एक लाख मदत जाहीर झाली आहे.
नांदेडच्या ज्ञानमाता शाळेचे आठवी व नववीचे सहलीला गेलेले 53 विद्यार्थी एस-5 डब्यात होते. त्यांच्यासोबत उपप्राचार्य फादर पीटर व 7 शिक्षक आहेत. हे सर्व जण सुखरूप आहेत, असे त्यांच्यासोबतचे दस्तगीर खान म्हणाले.
नांदेड व हिंगोलीचे 13 जण
रेल्वेत नांदेड, हिंगोली, पूर्णेचे 13 प्रवासी होते. आगग्रस्त डब्यातून प्रेमलता राठी (61), दलविंदर कौर (25),अनिरुद्ध एन.कुलकर्णी (24),एम. बी.पाटील (73), मंजुनाथ पाटील (36), चंदनपाल राठी (72), तनुर्शी जयरथ (26) हे नांदेडला येत होते. सायंकाळपर्यंत त्यांची काही माहिती मिळू शकली नव्हती. अनिरुद्ध कुलकर्णी बंगळुरूत आयबीएम कंपनीत आहेत. पुण्याला बदली झाल्याने ते नांदेडला येत होते. हिंगोलीच्या आदर्श कॉलेजातील ईश्वर नगरे, पत्नी कविता (61) व नात जयू (9) हे डब्यात होते. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे स्नेहल नगरे यांनी सांगितले.


रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी तीन वाजता नांदेडकडे निघालेल्या 16594 रेल्वे बोगीच्या सेकंड एसी कोचमध्ये आग लागली. या बोगीमध्ये 64 प्रवासी होते. थंडी आणि धुक्यामुळे मदतकार्य करण्यात अडचण निर्माण होत असल्याचेही रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले.