आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरमध्ये जवानाचे अपहरण करून हत्या; गावाजवळच शेतात सापडला मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात अतिरेक्यांनी रजेवर आलेल्या जवानाचे अपहरण करून हत्या केली. शुक्रवार संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या इरफान अहमद डारचा मृतदेह शनिवार सकाळी वतमुल्लाह कीगम भागातील शेतात सापडला. अतिरेक्यांनी त्यांना ३ गोळ्या मारल्या होत्या. काश्मिरात यंदा रजेवर आपल्या घरी आलेल्या जवानाच्या हत्येची ही तिसरी घटना आहे. 


संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया म्हणाले, ‘इरफान अहमद उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये प्रादेशिक लष्करी तुकडीत तैनात होते. ते २६ नोव्हेंबरपर्यंत रजेवर होते.’ बहुतेक अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण करून हत्या केली आहे. पोलिस कसून तपास करत आहेत.

 

एकाच दिवसानंतर संपणार होती रजा

शोपियांच्या सेजान गावाचे २३ वर्षीय जवान इरफान अहमद डार २६ नोव्हेंबरपर्यंत रजेवर घरी आले होते. मात्र रजा संपण्याच्या एका दिवसाआधीच अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. डार शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह शेतात आढळला. जवळच त्यांची कारही होती. यानंतर पोलिस व लष्करी पथकही पोहोचले. 

 

वर्षभरातील तिसरी घटना 
- यंदा मेमध्ये ले. उमर फय्याज यांचीही शोपियांत अतिरेक्यांनी हत्या केली होती. कुलगामचे रहिवासी उमर मावस बहिणीच्या लग्नात अाले होते.
- सप्टेंबरमध्ये बांदीपोरात बीएसएफ जवान रमीज यांची घरीच हत्या करण्यात अाली होती. अतिरेकी त्यांचे अपहरण करू पाहत हाेते. कुटुंबीयांनी विरोध केल्याने रमीज यांच्यावर गोळीबार झाला.

 

हाफिजच्या मीडिया वार्तांकनावर बंदी 
- हाफिज सईदला नजरकैदेतून मुक्त करण्याच्या कृत्यावर पडदा घालण्यासाठी पाकिस्तानने त्याच्याशी संबंधित मीडिया वार्तांकनावर बंदी लादली. त्यानेच घडवून आणलेल्या मुंबई हल्ल्याला आज ९ वर्षे होत आहे.


शांततेचे प्रयत्‍न थांबणार नाहीत- जम्‍मूकाश्‍मीर मुख्यमंत्री
- जम्‍मूकाश्‍मीरच्‍या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट करुन या हत्‍येची निंदा केली आहे. त्‍या म्‍हणाल्‍या, 'इरफान अहमद हे एक शूर जवान होते.  अशा पद्धतीच्‍या क्रूर घटनांनी काश्‍मीर खो-यात शांतता आणण्‍याचे आमचे प्रयत्‍न कमी होणार नाहीत.'
- उमर अब्‍दुला यांनीही जवानाच्‍या हत्‍येची निंदा केली आहे. ते म्‍हणाले, 'युवा इरफानची हत्‍या अत्‍यंत दु:खी करणारी आहे. आम्‍ही याची निंदा करतो. त्‍यांच्‍या कुटुंबांप्रती आम्‍ही सर्वजण संवेदना व्‍यक्‍त करतो.'

 

शोपियामध्‍येच झाली होती आर्मी लेफ्टनंटची हत्‍या
- याचवर्षी मे महिन्‍यात शोपियामध्‍ये आर्मी लेफ्टनंट उमर फैयाज यांची दहशतवाद्यांनी हत्‍या केली होती. कुलगाम येथे राहणारे उमर आपल्‍या बहीणीच्‍या लग्‍नासाठी शोपियाला आले होते.
- दहशतवाद्यांनी त्‍यांचे अपहरण करुन नंतर त्‍यांची हत्‍या केली होती. त्‍यांच्‍या डेडबॉडीजवळ रायफलीचे रिकामी काडतूसेही मिळाली होती. आर्मी ज्‍वॉइन केल्‍यानंतर उमर यांना दहशतवाद्यांकडून जिवे मारण्‍याच्‍या धमक्‍या मिळाल्‍या होत्‍या.

 

बांदीपोरा येथे झाली होती BSF जवानाची हत्या
- सप्‍टेंबरमध्‍ये बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी बीएसएफ जवान मोहम्‍मद रमीज यांची त्‍यांच्‍या घरी हत्‍या केली होती.
- वृत्‍तसंस्‍थेनूसार, दहशतवाद्यांनी रमीज यांच्‍या अपहरणाचा प्रयत्‍न केला होता. कुटुंबियांनी त्‍यांना विरोध करताच त्‍यांची गोळ्या घालून हत्‍या करण्‍यात आली.
- जवान रमीज बारामुला येथे तैनात होते. 26 ऑगस्‍टपासून 37 दिवसांच्‍या सुटीसाठी ते घरी आले होते. 2011मध्‍ये त्‍यांनी बीएसएफ जॉईन केले होते. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...