आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 Electrocuted In Rajasthans Tonk As High Tension Wire Falls On Bus

वऱ्हाडाच्या बसवर कोसळली विजेची तार, विजेचा झटक्याने 25 जणांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील सांस गावाजवळ विजेच्या झटक्यातने होरपळलेले दोघे - Divya Marathi
राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील सांस गावाजवळ विजेच्या झटक्यातने होरपळलेले दोघे
जयपूर- राजस्थानात एका वऱ्हाडाच्या बसवर वीजेची तार कोसळल्याने सुमारे 25 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अनेक जण होरपळले आहेत. टोंक जिल्ह्यातील सांच गावाजवळ ही धक्कादायक तितकीच दुर्दैवी घटना घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी की, एका वऱ्हाडाची बस रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीजेच्या खांबावरील 33केव्ही हायटेंशन तार अचानक तुटून बसच्या टपावर कोसळली. संपूर्ण बसमध्ये करंट उतरून विजेच्या धक्क्याने 25 जणांचा मृत्यू झाला.
मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माजी सरपंचाच्या घरी जात होते वर्‍हाडी
टोंक जिल्ह्यातील बाछेडा गावाचे रहिवासी जयराम यांचे चिरंजिव रामचरण यांच्या लग्नाचे हे वर्‍हाड आहे. बाछेडाहूनमोरला येथे हे वर्‍हाड जात होते. मोरलाचे माजी सरपंच रामधन यांच्या कन्येसोबत रामचरणचा आज (शुक्रवार) विवाह होणार होता. वर्‍हाड मोरला येथे पोहोचण्याआधीच सांस गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
मदतीला युवती आल्या धावून...
सांस गावातील रहिवासी भंवरसिंह यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच गावातील काही युवती मदतीसाठी धावून आल्या. युवतींनी स्वत: विजेची तार बाजुला करून बसमधून मृतदेह बाहेर काढण्यात मदत केली.
अनेक दिवसांपासून सैल होती तार
सांस गावातील लोकांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून विजेची तार सैल होती. वायरमनला बर्‍याच वेळा सांगून देखील त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित PHOTO...(फोटो: राकेश व्यास, पचेरा)