आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 Year Old Devendra Yadav Becomes The Second Youngest Mayor Of India

25 वर्षांच्या देवेंद्र यादवांनी मोडला महाराष्ट्राच्या CM चा रेकॉर्ड, जाणून घ्या कसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवेंद्र यादव - Divya Marathi
देवेंद्र यादव
रायपूर - भिलाईचे नवे महापौर देवेंद्र यादव यांनी निवडणूक जिंकण्यासोबतच अनेक विक्रमांवर नाव कोरले आहे. ते भारतातील तिसरे सर्वात तरुण महापौर बनले आहेत. याआधी हा विक्रम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर होता. या दोघांमधील साधर्म्य म्हणजे दोघांचेही नाव देवेंद्र आहे.

जाणून घ्या देवेंद्र यादवांनी कोणता विक्रम केला
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र यादव यांची जन्मदिनांक 19 फेब्रुवारी 1990 आहे, त्यानुसार त्यांचे वय 25 वर्षे 10 महिने आहे. 1970 मध्ये जन्मलेले देवेंद्र फडणवीस 1997 मध्ये 27व्या वर्षी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरचे महापौर झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत देशात सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांचेच नाव घेतले जात होते. गुरुवारी ( 31 डिसेंबर) देवेंद्र यादव यांनी भिलाई महापौर पदाची निवडणूक जिंकून या विक्रमावर नाव कोरले आहे. देशात सर्वात कमी वयात महापौर होण्याचा मान नवी मुंबईचे महापौर संजीव नाईक यांना मिळाला होता. ते वयाच्या 23 व्या वर्षी 1995 मध्ये महापौरपदी विराजमान झाले होते.
2013 मध्ये वय कमी असल्याने तिकीट नाकारले होते
देवेंद्र यादव यांना 2013 मध्ये विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती, मात्र विधानसभा निवडणुकीसाठीची वयाची अट तेव्हा ते पूर्ण करु शकत नसल्यामुळे त्यांना तिकीट मिळाले नव्हते. मात्र महानगर पालिका निवडणुकीत त्यांनी विजय मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देवेंद्र याआधी काँग्रेस प्रणित एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष देखिल होते.

देवेंद्र यादवांनी रचले विक्रम
- छत्तीसगडचे सर्वात तरुण महापौर.
- भिलाई महानगर पालिकेत सर्वाधिक मते मिळवणारे महापौर.
- भिलाई महानगर पालिकेत सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणारे महापौर.
- विद्यार्थी संघटनेत काम करत असताना पालिका निवडणूक लढवली आणि जिंकली. थेट महापौर पदापर्यंत पोहोचले.