आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधवा आईचे 'त्या' व्यक्तीशी भेटणे मुलाला नव्हते मान्य, तिने न ऐकल्याने केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धमतरी- येथील 25 वर्षाच्या मुलाने 45 वर्षाच्या आईची बेताने मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्येनंतर मुलाने स्वत: पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपण आईची हत्या केल्याचे सांगत आत्मसमर्पण केले. हे पाहून पोलिसांना देखील धक्का बसला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनास्थळ गाठले, तेव्हा तिथे रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला होता आणि तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.


जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
- घटना भथारा पोलिस स्टेशनपासून 10 किमी अतरावर असलेल्या सिलौटी या गावत घडली. येथील रहिवाशी विधवा महिला मृत महिलेच्या एकुलत्या एक मुलानेच तिची हत्या केली आणि हत्येनंतर स्वत: पोलिसांसमोर सरेंडर केले.
- पोलिसांनी सांगितले की, आरोपी मुलगा आपल्या आईच्या चारित्र्यावर संशय घेत होता. आपल्या आईचे गावातीलच एका वृद्ध व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय मुलाला आला होता. आरोपी मुलाला दोन मुलं देखील आहेत. 
- त्याने सांगितले की, आईला अनेक वेळा आर्ध्या वयाच्या व्यक्तीसोबत पाहिले होते. हे सर्व न करण्यासाठी तिला अल्टीमेटम देखील देण्यात आला होता. अशात त्याने मंगळवारी पुन्हा आईला त्या व्यक्तीसोबत पाहिले आणि त्याचा राग अनावर झाला. आरोपी मुलाने रागाच्या भरात घरात ठेवलेल्या बेताने मारून आईची हत्या केली. घटनेच्या वेळी आरोपीची पत्नी मुलांसोबत शेतात गेली होती. घरात कोणीच नव्हते.


फोटो : अजय देवांगन

पुढील स्लाइडवर पाहा बातमीशी संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...