आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

250 वर्षे जुन्या शैलीत महिनाभर चालते रामलीला, 5 KM परिसरात अयोध्या, लंका, पंचवटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामनगर(वाराणसी) - गंगा किनाऱ्यानजीक रामनगरमधील जगप्रसिद्ध रामलीला. अडीचशे वर्षे जुन्या रूढीपरंपरेतून आकारास आलेल्या या नाट्यास आधुनिकतेचा जराही स्पर्श झालेला जाणवत नाही. यातील संवाद, व्यक्तिरेखा किंवा इथले वातावरण असो, सर्वकाही जुन्या शैलीतच साकारले जात आहे. ही देशातील सर्वांत जुनी आणि दीर्घकाळपर्यंत चालणारी रामलीला संबोधली जाते. अनंत चतुर्दशीने सुरू होऊन दसऱ्याला त्याची सांगता होते.साधारण ३० दिवस हे नाट्य पाहण्यासाठी देश-विदेशातून दररोज १० हजार लोक रामनगरात येतात. नवमी आणि दसऱ्याच्या दिवशी तर ही संख्या लाखाच्याही पुढे जाते.
वाराणसी आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये रामलीला पाहण्याचे आकर्षण कायम आहे. यामुळेच लोक रेल्वे, बस, ऑटो, बैलगाडी किंवा मिळेल त्या साधनाने इथे येण्याचा आटापिटा करतात. ज्यांना कोणतेच साधन मिळत नाही ते अनेक किमीची पायपीट करतात. रामलीलेच्या शेवटी हाेणाऱ्या आरतीसाठी अलोट गर्दी होते. महिनाभरात येणे झाले नाही तरी आरती चुकू नये यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. या ३० दिवसांत लहानग्यांना खांद्यावर घेऊन खाण्यापिण्याच्या साहित्यासह जमा झालेली गर्दी एकाच दिशेने मार्गक्रमण करताना दिसते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी कोणतीही अनाउंसमेंट होत नाही. ग्रामीण भागात एकमेकांना निरोप देत माहिती पोहोचली जाते. रामलीलेसाठी तसा विशिष्ट मंचही नसतो. ५ किमी परिसरात विस्तारलेले रामनगर शहरच त्याचे रंगमंच आहे. येथील एखाद्या लोकेशनवर एखादा सीन होतो आणि लोक रस्त्यावर, घराच्या गच्चीवर किंवा मैदानावर बसून आनंद घेतात. दृश्याच्या आवश्यकतेनुसार कायमस्वरूपी ठिकाण विकसित केले आहे. रामनगरमध्ये एक अयोध्या आहे, तसेच इथे चित्रकूट, पंचवटी आणि लंका पाहावयास मिळते. रामलीलेचा प्रयोग मंच प्रकाशयोजना, माइक आणि मंचाच्या पेट्रोमॅक्स व मशालींच्या साहाय्याने होतो. त्या दिवशी राम,लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सीता रामबागमध्ये होते. वनवास झाल्याचे कथानक सुरू होते त्यामुळे त्यांना अर्धवट बांधलेल्या दोन खोल्यांत ठेवले होते. सुरक्षेत पोलिस कर्मचारी तैनात.त्यांच्यासोबत राहण्यास व देखभाल करण्यास व्यास व त्यांचे कुटुंब होते. मी गेले तेव्हा राम,लक्ष्मणाचा मेकअप झाला होता. सीतेला फायनल टच दिला जात होता. रामलीलेत सहभागी मुले आसपासच्या गावातीलच आहेत. त्यासाठी काशी महाराजांनी त्यांचे ऑडिशन केले होते. मुलांचे वय १४ वर्षांखालील व ते ब्राह्मण असावेत असा नियम आहे.तालमीसाठी मुले तीन महिन्यांपासून इथे राहतात. रावणाची व्यक्तिरेखा साकारणारे ७० वर्षांचे कलाका दहा वर्षांपासून हे पात्र करतात.नाट्यात सध्या आवश्यकता नसल्यामुळे ते घरीच आहेत. हनुमान आणि त्यांच्या वानरसेनेचा रोल करणारे एकाच कुटुंबातील सदस्य असून सर्व पदवीधर आहेत. केवटची भूमिका करणारा मल्लाह जातीचा आहे. ते गंगा नदीत नावाड्याचे काम करतात. कॅमेरा काढून छायाचित्र काढावे म्हटले तर राम झालेल्या मुलाने मला नकार दिला. अामचे छायाचित्र काढण्यास बंदी आहे. पोलिस तुमचा फोन हिसकावून घेतील,असे उत्तर त्याने दिले. त्यांना पोशाख, मेकअप आणि संवादावर बोलते करावे म्हटले तर त्यातील सीता झालेला मुलगा म्हणाला, आज आम्हाला खूप संवाद म्हणायचे आहेत. त्यामुळे आमच्याशी कमीच बोला. मी विचारले किती संवाद? तर त्यावर उत्तर आले, संपूर्ण रामलीलेत आमचे ७० संवाद आहेत.
> राम-लक्ष्मण होणारी मुले ३ महिन्यांपासून महालातच राहतात.
> आजही स्टेज, लाइट्स व माइकशिवाय होते रामलीला.
> राम ब्राह्मण असतो तर नाविक केवट जातीचा
पुढील स्लाइडमध्ये, रामलीलेआधी लक्ष्मण-सीता झालेली मुले भांडत होती, शत्रुघ्न-भरत फिरत होते
बातम्या आणखी आहेत...