आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरच्या या महालात आहे 2500 वर्षे जुनी डेड बॉडी! जाणून घ्या स्टोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( विद्युत रोषणाईमध्ये न्हाऊन निघालेला जयपूर येथील अल्बर्ट हॉल)

जयपूर- मुख्यमंत्री वसुंधरा राजे सरकारने 13 डिसेंबरला एक वर्ष पूर्ण केले. या निमित्ताने गुलाबी शहर म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाणारे जयपूर शहर सजवण्यात आल्या आहेत. जयपूरमधील पुरातन वास्तुवर विदुत रोषणाई सोडण्यात आली आहे. यात जगप्रसिद्ध असलेला येथील अल्बर्ट हॉलचा समावेश आहे.

अल्बर्ट हॉलमध्ये सुमारे 2500 वर्षे पुरातन पार्थिव (ममी) अजूनही शाबूत आहे. एका महिलेचे हे पार्थिव असून त्याला जडीबुटी लावून त्याचे जतन करण्यात येत आहे. त्यामुळे हे पार्थिव 2500 वर्षेपूर्वी होते अगदी तसेच आहे. येथे देश-विदेशातील हजारो पर्यटक येथील पुरातन वस्तु पाहुन मनमुराद आनंद घेतात.

अल्बर्ट हॉलमधील ठेवलेले पार्थिव एका तूतू नामक महिलेचे आहे. खेम नामक देवाची आराधणा करणार्‍या पुरोहित कुटुंबातील ही महिला होती. तूतूचा मृत्यु झाला तेव्हा तिचे वय 50 ते 60च्या दरम्यान असावे. इजिप्तमधील प्राचीन नगर पॅनोपोलिसमधील अखमीन भागातून हे पार्थिव आणले आहे.

अल्बर्ट हॉलमध्ये 2500 वर्षे पुरानत पार्थिवासह अनेक प्राचीन वस्तु पाहाता येतात. त्यात भींतीवर टांगलले भले मोठे पेटिंग्ज, मूर्ती आणि तत्कालीन महिला-पुरुषांचे पोषाखाचा समावेश आहे.

अनेक वर्षांपासून लाकडाच्या पेटीत ठेवण्यात आलेले पार्थिव आजही होते तसेच आहे. इतकी वर्षे एखाद्या व्यक्तीचे पार्थिव कसे काय शाबूत राहू शकते, असा प्रश्न येथे येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला पहल्याशिवाय राहात नाही. खराब झालेली लाकडाची पेटी 2011 मध्ये दुरुस्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे या कामासाठी इजिप्तमधून एका पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी पार्थिवाचा एक्स-रे देखील करण्यात आला होता. 2011 मध्ये लाकडी पेटीतून ममीला पहिल्यांदा बाहेर काढण्यात आले होते. यापूर्वी 1998 मध्ये ममीला रेस्टोरेशनही करण्यात आले होते. इजिप्तमधून पॅनोपोलिसमधून आणलेली ही ममी अल्बर्ट हॉलचे मुख्य आर्कषण आहे.

पुढील स्लाइड्स क्लिक करून पाहा, 2500 वर्षे पुरातन ममी आणि अलबर्ट हॉलची छायाचित्रे...