आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरीचे आमिष दाखवून आणलेल्या मुलीवर 27 जणांनी 24 तास केला बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरमधील इंद्रप्रस्थ हॉटेल. येथेच झाले तरुणीवर अत्याचार. - Divya Marathi
जयपूरमधील इंद्रप्रस्थ हॉटेल. येथेच झाले तरुणीवर अत्याचार.
जयपूर - दिल्लीतील मंगोलपूर येथे राहाणाऱ्या 17 वर्षीय तरुणीवर जयपूरमधील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांसह 27 जणांनी बलात्कार केला होता. तरुणीवर 24 तास अत्याचार सुरु होते. भूक आणि वेदनेने घायाळ तरुणीने कशीतरी तेथून स्वतःची सुटका करुन घेतली आणि दिल्लीत येऊन तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.
तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून एका जोडप्याने जयपूरला आणले होते. येथील हॉटेल इंद्रप्रस्थ मध्ये 30 ऑगस्ट रोजी तिला सोडून दिले. त्याच दिवशी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तरुणीला जयपूरला घेऊन येणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे, की ते तरुणीला देहव्यापाराच्या दलदलीत फेकून देणार होते. जेव्हा हॉटेलच्या रुममध्ये तिच्यावर अत्याचार सुरु होते तेव्हा ते दलालांसोबत तिचा सौदा करत होते.
24 तास सुरु होते अत्याचार
30 ऑगस्ट रोजी इंद्रप्रस्थ हॉटेलची रुम बुक करण्यात आली होती. तरुणीचे म्हणणे आहे, की 30 ते 31 ऑगस्ट दरम्यान 24 तास माझ्यावर बलात्कार करण्यात आला. 31 ऑगस्ट रोजी तरुणी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली. 5 सप्टेंबर रोजी हॉटेलच्या मॅनेजरला अटक करण्यात आली.
सहा आरोपी जेरबंद
तरुणीने हॉटेलमधून पळ काढल्यानंतर दिल्लीला आली. येथे तिने मंगोलपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी जोडप्याचा शोध घेण्यासाठी जयपूरमध्ये अनेक ठिकाणी छापे मारले. या कारवाईत आरोपी जोडप्यासह सहा जणांना अटक करण्यात आली. त्यात हॉटेल इंद्रप्रस्थमध्ये काम करणारा मुकेश, अनिल, अर्जुन आणि आणखी एकाचा समावेश आहे. एका आरोपीला पकडण्यासाठी दिल्ली पोलिस जयपूर पोलिसांसह अजूनही छापेमारी करत आहे.