आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाद्रमुकमध्ये सरचिटणीस पदासाठी निवडणूक,जयललितांच्या वारसाबाबत मात्र मौन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे चुकीचे ठरणार नाही. पक्ष लवकरच सरचिटणीस पदाची निवडणूक घेणार आहे, असे तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुकने शनिवारी स्पष्ट केले. दरम्यान, शशिकला यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीसपद सोपवण्यात यावे, अशी मागणी एका गटाकडून करण्यात आली आहे.

पक्षाचे संघटन सचिव सी. पोनइया यांनी शनिवारी मंत्र्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर ते शशिकला यांच्यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर म्हणाले, शशिकला यांनी बैठकीत सहभागी होणे चुकीचे नाही. परंतु त्यांनी रुग्णालयात जयललिता असताना त्यांना जाणीवपूर्वक कोणासही भेटू दिले नाही, हा आरोप पोनइया यांनी फेटाळून लावला. विरोधकांनी पसरवलेली ही अफवा असल्याचे त्यांनी म्हटले. जयललिता यांच्या ११३.७२ कोटी रुपयांच्या संपत्तीचे वारसापत्र तयार करण्यात आलेले आहे का, या प्रश्नावर मी काहीही सांगू शकणार नाही, असे पोनइया यांनी स्पष्ट केले. याच वर्षी एप्रिलमध्ये जयललिता यांनी आपली संपत्ती जाहीर केली होती. त्यात ४१.६३ कोटी स्थावर व ७२.०९ कोटी जंगम मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले होते.

द्रमुकची सर्व साधारण सभेची बैठक २० डिसेंबरला : द्रमुकची सर्वसाधारण सभा २० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मे २०१६ मध्ये अण्णा द्रमुककडून तामिळनाडूत पराभव स्वीकारल्यानंतर पक्षाने पहिल्यांदाच सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. पक्षात काही नवीन बदल करण्यासंबंधी बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर पक्षाची पुढील वाटचाल ठरणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

अम्मांच्या निधनाच्या धक्क्याने २८० मृत्यू
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने मृृत्यू झालेल्या लोकांची संख्या २८० आहे. शनिवारी राज्य सरकारने त्यासंबंधीची यादी जाहीर केली आहे. यादीत २०३ नावे देण्यात आली आहेत. हे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ७७ लोकांची यादी याअगोदरच जाहीर करण्यात आली होती. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना पक्षाच्या वतीने प्रत्येकी तीन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.


आठ जिल्ह्यात 203 लोकांचा मृत्यू...
- रिपोर्टनुसार, AIADMK ने 280 लोकांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील चेन्नई, वेल्लोर, तुरुवालोर, थिरुवअनंतपुरम, कुड्डलोर, कृषीनगर, एरोड आणि तिरुपुर या आठ जिल्ह्यात 203 लोकांचा मृतांमध्ये समावेश आहे.
- काही दिवसांपूर्वी पक्षाने 77 लोकांची यादी जाहीर केली होती.
- जयललिता यांना फुफ्फुसाच्या विकारामुळे चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले होते. जयललिता यांना ह्दयविकारांचा दुसरा झटका आल्याचे समाजताच त्यांच्या हजारो समर्थकांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी केली होती.
- मात्र, जयललितांचे निधनाचे वृत्त समजताच 30 लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे.
- मीडिया रिपोर्टनुसार, जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या हाताचे बोटेे कापून घेतले आहेत. त्यांना पक्षाने प्रत्येेक 50-50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
बातम्या आणखी आहेत...