आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात आज ब्लॅक डे: जाट आंदोलनाला हिंसक वळण; रेल्वे ट्रॅकवर ठिय्या आंदोलन, गेट तोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणा- 31 दिवसांपासून सुरु असलेल्या जाट आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले आहे. हिसारमध्ये पोलिसांनी रामपाल समर्थकांचे आंदोलन उधळून लावल्यानंतर दुपारी 1 वाजता संतप्त आंदोलकांनी दिल्ली-सिरसा रेल्वे ट्रॅकवर ठिय्या आंदोलन केले. इतकेच नाही तर रामायण गावजवळ आंदोलकांनी रेल्वे गेट तोडले. दरम्यान, जाट आरक्षणाच्या मागणीसाठी आज ब्लॅक डे पाळण्यात आला आहे.

दीड तास रेले रोको, वाहतूक ‍विस्कळीत...
- सरकारद्वारा स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीसोबत जाट नेत्यांच्या अनेक बैठकी झाल्या. पण त्या निष्फळ ठरल्या. मागील काही दिवसांपूर्वी जाट नेते यशपाल मलिक यांनी 26 फेब्रुवारीला काळा दिवस (ब्लॅक डे) पाळण्याचा इशारा दिला होता. यासोबतच दिल्लीला दूध आणि भाजीपाला पाठवणे बंद करण्याचे जाट समुदायाने आवाहन केले होते. 
- या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शनिवार सायंकाळी अनेक जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद केली होती. हिसारमध्ये आज सकाळपासून इंटरनेट सेवा बंद आहे. 
- रामायण गावात रामपाल समर्थकांचे आंदोलन पोलिसांनी उधळून लावले. संतापलेले समर्थक दुपारी रेल्वे ट्रॅकवर उतरले. त्यांनी ट्रॅकवर ठिय्या आंदोलन केले. दिल्ली-सिरसा रेल्वे ट्रॅकवर अनेक गाड्या रोखण्यात आल्या.
बातम्या आणखी आहेत...