आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसची ट्रकला भीषण धडक, 3 महिला ठार, 16 गंभीर; वेग प्रचंड असल्याने अशी फाटली बस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरोही - गुजरात ते अहमदाबादमधून प्रवासी घेऊन बुधवारी राजस्थानच्या रामदेवराकडे जाणारी भरधाव खासगी प्रवासी बस सिरोही रोडवरील एका फाटकाजवळ समोरच्या ट्रकला जोरात आदळली. या दुर्घटनेत बसमध्ये स्वार 3 महिलांचा मृत्यू झाला. तर 16 महिला जखमी झाल्या. दुर्घटनेनंतर हायवेवर एका बाजूने ट्रॅफिक जाम लागला होता. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता मोकळा केला.
 
कसा झाला अपघात...
गुजरातच्या साणंद अहमदाबादहून महिलांचा एक ग्रुप बसने रामदेवराकडे जात होता. ही बस सिरोही रोडवरील अजरी फाटकाजवळ पोहोचताच हा अपघात झाला.
- बुधवारी बसच्या ड्रायव्हरने बसला सिरोहीकडे वळवण्याऐवजी उदयपूर चौपदरी ओव्हरब्रिजवर नेले. या चौपदरी पुलावर अगोदरच एक ट्रक होता.
- बस ड्रायव्हरने अचानकच बसला ओव्हरब्रिजवर नेले यामुळे त्याला पुढे असणारा ट्रक दिसला नाही आणि हा अपघात घडला.
- बसचा वेग प्रचंड असल्याने बस थेट ट्रकमध्ये घुसली. अपघातात 2 महिला जागेवरच ठार झाल्या, तर एका महिलेचे रुग्णालयात निधन झाले.
- बस ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला. अॅक्सिडेंटनंतर राजमार्गावर तब्बल अर्धा तास जाम लागला होता.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...