आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये पुराचे तांडव...52 जण बुडाले; यूपीमध्ये एनडीआरएफ पथक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारच्या सीतामढी शहरात पुराचे पाणी शिरल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. - Divya Marathi
बिहारच्या सीतामढी शहरात पुराचे पाणी शिरल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
पाटणा/लखनऊ - बिहार आणि उत्तर प्रदेशात संततधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी बिहारमध्ये ५२ तर उत्तर प्रदेशात १८ लोकांचा मृत्यू झाला. दोन्ही राज्यांत लष्कर आणि एनडीआरएफचे पथक  मदतकार्यात गुंतले आहेत.
 
दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हवाई पाहणी केली. बिहारमध्ये सीतामढी येथे पुराचे पाणी शहरातून वाहू लागले आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या पावसाचा परिणाम येथील नद्यांवर होतो आहे. गंडक, बुढी गंडक, मसान, पंडई, दोहरम, गांगुली, सिकटा, ओरिया, द्वारदह, हडबोडा, बलोर, हरपतबेनी अादी नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. तीन दिवसांत सीतामढी आणि बेतिया येथे ५२ जणांचा मृत्यू झाला. पश्चिम चंपारण जिल्ह्यात शनिवारी पुराने कहर केला आहे.
 
बेतियामध्ये २० जण दगावले तर सीतामढीमध्ये ३२ जण दगावले आहेत. पूर्व चंपारणमध्ये पुरामुळे १५ परिमंडळांत प्रभाव जाणवतो आहे. पूरग्रस्त भागात एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. मोतिहारी शहरात पुराचे पाणी वाढते आहे. मोतिहारी-रक्सोल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
 
उत्तर प्रदेशात १८ जण पाण्यात बुडाले
उत्तर प्रदेशात गेल्या ४-५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला. या पुराचा फटका सुमारे ८ लाखांहून अधिक कुटुंबांना बसला आहे. परिस्थिती बिघडत चाललेली पाहून महाराष्ट्रातील पुणे येथून एनडीआरएफचे ४ पथक मागवण्यात आले. लष्करासही पाचारण करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी दौरा केला. तेथे मदतकार्य सुरू आहे. प्रधान सचिव अरविंदकुमार यांनी सांगितले, पूरग्रस्त भागासाठी एनडीआरएफची चार पथके एअरलिफ्टने मागवण्यात आली.
 
देशात सामान्यपेक्षा 3 टक्के कमी पाऊस, द. भारतात 17 टक्के कमी
देशात सामान्यापेक्षा तीन टक्के कमी पाऊस पडला आहे. दक्षिणते 17 अक्के तर मध्य भारतात 7 टक्के कमी पाऊस पडला. तथापि, सुमारे 10 राज्यांमध्ये पूरपरिस्थिती आहे. पूर्वोत्तर भारत, बिहार, आणि उत्तर प्रदेश सर्वाधिक प्रभावित आहेत.

आसाम: 30 वर्षांचा विक्रम मोडीत, 70 टक्के भागांत पाणी
ब्रम्हपुत्र नदी दुसऱ्यांदा दुथडी वाहतेय. यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या 70 टक्के भागांत पाणी आहे. यंदा पावसाने 30 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे.

उत्तराखंड: कैलास मानसरोवर मार्गावर ढगफुटी, चार ठार
पिथौरगड जिल्ह्यात कैलास मानसरोवर मार्गावर सोमवारी पहाटे ढगफुटीमुळे 3 जवानांसह चौघे ठार झाले असून 6 जण बेपत्ता आहेत.

पुढील स्‍लाइडवर...देशातील पावसाची स्थिती...
बातम्या आणखी आहेत...