आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरच्या हंदवाडामध्ये जवानांनी लश्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये सुरक्षा दलांनी एन्काऊंटरमध्ये लश्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे राहणारे आहेत. जम्मू-काश्मीरचे डीजीपी एसपी वैद यांनी ट्वीट करत जवानांचे अभिनंदन केले आहे. गेल्या 10 महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये 190 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यापैकी 110 विदेशी दहशतवादी होते तर 80 स्थानिक दहशतवादी होते. शनिवारी बांदीपोराच्या हाजीन एन्काऊंटरनंतर रविवारी आर्मीच्या 15 कॉर्प्सच्या जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) लेफ्टनंट बीएस संधू यांनी ही माहिती दिली होती. 
 
 
परिस्थितीत बरीच सुधारणा.. 
- हाजीन एन्काऊंटरमध्ये लष्करचे 6 दहशतवादगी मारले गेले. त्यात मुंबई हल्ल्यातील मास्टर माइंड झकी उर रेहमान लखवीचा पुतण्या ओवैद उर्फ उस्माना जंगी याचाही समावेश होता. 
- बीएस संधू म्हणाले, मारल्या गेलेल्या 110 विदेशी दहशतवाद्यांपैकी 66 जणांना घुसखोरी करताना नियंत्रण रेषेजवळ कंठस्नान घालण्यात आले. विशेष म्हणजे, काश्मीर खोऱ्यात यावर्षी आम्ही 125-130 दहशतवाद्यांना मारले आहे. त्यामुळे परिस्थितीत बरीच सुधारणा पाहायला मिळत आहे. 
 
हाजीन एन्काऊंटरमागील कारण?
संधू यांनी सांगितले की, आम्ही हाजीनमध्ये मिड सप्टेंबरमध्ये काही ऑपरेशन सुरू केले होते. त्यानंतर आम्ही याठिकाणी सुमारे रोज सर्च ऑपरेशन सुरू केले. याठिकाणी आम्ही स्पेशल फोर्स तैनात केली. ठोस माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सीआरपीएफ, आर्मी आणि पोलिसांनी ऑपरेशन सुरू केले. त्यात 6 दहशतवादी मारले गेले. ते सर्व विदेशी होते. आम्ही या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सर्व एजन्सीचे कौतुक केले. लोकल दहशतवाद्यांना हा विचार करावा लागेल की, ते स्वतःला मुजाहीद म्हणतात, पण ते खरंच मुजाहीद आहे की, पाकिस्तानसाठी प्रॉक्सी वॉर लढत आहेत. 
 
खोऱ्यात ISIS चा प्रभाव?
जम्मू-काश्मीरचे डीजीपी एसपी वैद म्हणाले, काश्मीर खोऱ्याला हिंसा, बंदुका आणि ड्रग्सपासून मुक्त करावे लागेल. एजन्सी आणि जवानांनी मिळून जे काम केले आहे, त्याचे कौतुक करावे लागेल. पण काश्मीरमध्ये ISIS चा प्रभाव आहे किंवा नाही, याचा तपास करावा लागणार आहे. माझ्या माहितीनुसार ISIS चा प्रभाव नाही. 
 
हे ही जाणून घ्या.. 
- गेल्या 22 महिन्यांत 10 दहशतवाद्यांनीच काश्मीरमध्ये सरेंडर केले आहे. 
- 5000 च्या जवळपास दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. 
- 1100 दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी परतण्याची विनंती केली आहे. 
 
ऑपरेशन ऑलआऊट अखेरच्या टप्प्यात 
काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत लष्कर आता दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अंतिम बालेकिल्ला उध्वस्त करण्यात्या प्रयत्नात आहे. याठिकाणी शोपियां जिल्हा हा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित असल्याचे समजले जाते. येथे दहशतवाद्यांच्या हालचाली अगदी सहजपणे पाहायला मिळतात. लष्कर याठिकाणी नवीन कॅम्प लावण्याची शक्यता आहे. सीआरपीएफ बटालियनही तैनात करण्यात आले आहे. 
 
 
5 वर्षात मारले गेले दहशतवादी 
2012-13   - 157
2013-14   - 57
2014-15   - 94
2015-16   - 157
2017        - 190
 
बातम्या आणखी आहेत...