आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघातात ट्रकसोबत फरपटत गेली बाइक, रस्त्यावर पडले चिमुकल्यांचे मृतदेह, आईचा आक्रोश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातात ट्रकमध्ये फसून बाइकस्वार तरुण 100 फूट फरपटत गेला. - Divya Marathi
अपघातात ट्रकमध्ये फसून बाइकस्वार तरुण 100 फूट फरपटत गेला.

लखनऊ - राजधानीच्या बंथरा परिसरात शुक्रवारी सकाळी एक बाइक आणि डंपरची भीषण धडक झाली. धडक होताच बाइकवरील 3 मुले उडून पडली, तर बाइकचालक डंपरमध्ये फसल्याने बाइकसह तब्बल 100 फूट फरपटत गेला. अपघातात बाइकचालकासह 2 चिमुकल्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दुसरीकडे, एका जखमी चिमुकल्याला ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. येथे डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी डंपरला ताब्यात घेतले आणि मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. 

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- रामदासपूर येथील मेवालाल रावत यांची मुलगा सपना (14), बिट्टू (13) आणि निखिल (9) आपल्या मावस बहिणीच्या लग्नात गेले होते.
- शुक्रवारी सकाळी तिघेही आपल्या मामाच्या शेजारी राहणाऱ्या तरुणासह - प्रकाश रावत (45) सह त्याच्या बाइकवरून घरी परतत होते. यादरम्यान बंथराच्या बनी मोहान रोडवर समोरून येणाऱ्या वेगवान अनियंत्रित डंपरने त्याच्या बाइकला जोरदार धडक दिली.
- धडक लागताच बाइकवर स्वार तीन मुले उडून दूर जाऊन पडली. तर अवध प्रकाश डंपरमध्ये फसून तब्बल 100 मीटर दूर बाइकसह फरपटत गेला.
- यादरम्यान डंपरही अनियंत्रित होऊन रोडच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातात बाइकस्वार अवध प्रकाश, निखिल आणि कल्पनाचा जागेवर मृत्यू झाला, तर अर्चना गंभीर जखमी झाली आहे. दुर्घटनेनंतर डंपरचा ड्रायव्हर फरार झाला.
- वाटसरूंनी दिलेल्या माहितीवरून घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सर्वांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी अवध प्रकाश, निखिल आणि कल्पनाला मृत घोषित केले. तर जखमी अर्चनाला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रेफर करण्यात आले.


शाळेत जाण्यासाठी निघाले होते लग्नातून
- मावस बहिणीच्या लग्नसोहळ्यात गेलेल्या या मुलांसह त्यांची आई किरण, वडील मेवालाल आणि छोटा भाऊ प्रिन्स (5) हेही गेले होते.
- परंतु, निखिल, कल्पना आणि अर्चनाला शाळेत जायचे होते. यामुळे त्यांचे वडील मेवालाल यांनी त्यांना अवध प्रकाशसह त्याच्या बाइकवरून घरी पाठवले होते.

 

काय म्हणतात पोलिस?
- एसओ शिवशंकर सिंह म्हणाले, डंपरला ताब्यात घेतले आहे. तर ड्रायव्हर फरार झाला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, भीषण अपघाताचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...