आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांच्‍या हल्‍ल्‍यात तीन जवान शहीद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- छत्तीसगडमधील बस्‍तर जिल्‍ह्यात नक्षलवाद्यांनी आज (रविवारी) सकाळी टीव्‍ही टॉवरवर केलेल्‍या हल्‍ल्‍यात तीन जवान शहीद तर एक जण जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मरेंगा गावी सकाळी नक्षलवाद्यांनी टीव्‍ही टॉवरच्‍या सुरक्षेसाठी तैनात असलेल्‍या पोलिस दलाच्‍या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्‍ये तीन जण शहीद तर एक जवान जखमी झाला. जखमी जवानास इलाजासाठी रायपूरला पाठवण्‍यात आले आहे. नक्षलवाद्यांच्‍या तपासासाठी पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली आहे.