आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3 Suspected Terrorists With Pak SIM Cards, AK47s Arrested In Mohali

पंजाब उद्धवस्त करण्याच्या तयारीने आले होते दहशतवादी? सापडले 26 किलो RDX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहालीत सोमवारी जप्त करण्यात आलेली शस्त्रे दाखवताना पंजाब पोलिस - Divya Marathi
मोहालीत सोमवारी जप्त करण्यात आलेली शस्त्रे दाखवताना पंजाब पोलिस
चंदीगड - पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी सुंयुक्तरित्या केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये 26 किलो आरडीएक्स सापडले आहे. हा साठा पाकिस्तान सीमेलगतच्या पंजाबच्या बहियाल भागात सापडला. पोलिस आणि लष्कराचे सर्च ऑपरेशन पठाणकोटपासून गुरदासपूरपर्यंत सुरु आहे.

सर्च ऑपरेशनमध्ये सापडले एनर्जी ड्रिंक
- लष्कराला सीमेवर एनर्जी ड्रिंक्स रेडबुलच्या 13 बॉटल आणि गुडघ्यांपर्यंतच्या बुटांचे तीन जोड सापडले आहे.
- रेड बुल बॉटल्स आणि बुट पाकिस्तान मेड आहेत.
- सर्वप्रथम स्थानिकांची त्यावर नजर पडली आणि त्यांनी पोलिसांना कळवले.

सोमवारी मोहालीतून जप्त केले होते पाकिस्तानी शस्त्र
- पंजाब पोलिसांनी मोहालीच्या खरड येथू सोमवारी तीन संशयीतांना शस्त्रांसह अटक केली होती.
- पोलिसांनी त्यांच्याकडून पाकिस्तानचे सिम आणि शस्त्र जप्त केले होते. हे लोक ड्रग्सची तस्करी करतात. पोलिसांनी त्यांच्याकडून पाकिस्तान, ब्राझील आणि चीनी बनावटीची शस्त्रे जप्त केली.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, फोटोज्...