आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर: त्राल येथे 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्याला यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- पुलवामाच्या त्राल येथे लष्कर तुकडीने ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. सूचना मिळताच सुरक्षा दलाने त्रालच्या गुलाब बाग परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. 

दरम्यान, माछिल सेक्टरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीविषयी सैन्याने बुधवारी सांगितले की, ठार केलेल्या ५ दहशतवाद्यांजवळ पाकिस्तान आणि चिनी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा मोठा साठा मिळाला आहे. या मोहिमेचे कमांडर आर. के. सुरेश यांनी म्हटले की, दहशतवाद्यांजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके मिळाली. त्यांच्याकडे पाकिस्तानातून आणलेली आैषधे आणि रेशनही मिळाले आहे.  

छत्तीसगडमध्ये पाच नक्षलवादी अटकेत
रायपूर- छत्तीसगडच्या बस्तर विभागातून पाेलिसांनी बुधवारी पाच नक्षलवाद्यांना अटक केली. पाचपैकी चाैघांना विजापूर जिल्ह्यातून, तर अन्य एकाला नारायणपूर जिल्ह्यातून अटक करण्यात अाली, असे पाेलिस सूत्रांनी सांगितले. केंद्रीय राखीव पाेलिस दलाच्या (सीआरपीएफ) काेबरा पथकाने विशेष कृती दल व जिल्हा कृती दलासह विजापूर जिल्ह्यातील गंगालूर भागात मंगळवारपासून राबवलेल्या माेहिमेत ही कारवाई करण्यात अाली. गस्तीदरम्यान चार नक्षलवाद्यांना अटक केली. 
बातम्या आणखी आहेत...