आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षीय चिमुरडीवर विद्येच्या मंदिरात अत्याचार, पालक व पोलिसांत बाचाबाची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- बंगळुरुतील इंदिरा नगरातील एका शाळेच्या आवारात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित चिमुरडीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
पी‍डित चिमुरडीच्या नातेवाईकांसह काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी रस्त्यावर या घटनेचा निषेध केला. पोलिस आणि पालकांमध्ये शाब्दीक चकमक उडाल्याचे वृत्त आहे.
चिमुरडीचा आक्रोश
मिळालेली माहिती अशी की, इंदिरा नगरात ही घटना घडली. पीडिता प्री-नर्सरीची विद्यार्थिनी आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान तिचे पालक तिला घेण्यासाठी शाळेत आले तेव्हा ती रडत होती. वेदनेमुळे ती आक्रोश करत होती. पालकांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले.मुलीवर अत्याचार झाल्याचे वैदयकीय तपासणी स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला असता तिने फक्त ‘स्कूल अंकल’ उच्चारले. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.