आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंद खोलीत स्वत:चे इंटिमेट Video बनवून करत होती ब्लॅकमेल, असा झाला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस कस्टडीत आरोपी तरुणी. - Divya Marathi
पोलिस कस्टडीत आरोपी तरुणी.

भिलाई - येथे 3 तरुणी आणि 2 तरुणांच्या टोळीने अशी दहशत पसरवली की अनेक लोक बरबाद झाले. गोष्टच अशी घडली की कुणीही बदनामीमुळे तोंडही उघडले नाही. एका तरुणाने हिंमत दाखवली आणि या टोळीचे सत्य समोर आले. गोड बोलून लुबाडणाऱ्या तरुणींचे सत्य समोर आले.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- पोलिस इन्स्पेक्टर विनय सिंह म्हणाले, केलाबाडी येथील रहिवासी मो. खलील (27) याला 19 नोव्हेंबरला एक फोन आला.
- ट्रू कॉलरमध्ये नाव आफिया दिसत होते. तरुणीने त्याच्याशी गोड-गोड गप्पा केल्या आणि भेटायला बोलावले.
- तरुणीने त्याला भिलाईच्या रुग्णालयाजवळ बोलावले. तेथे तिच्यासोबत एक आणखी तरुणी खलीलला आढळली. दोघींनी त्याला इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर नेले.
- तेथे तो तरुणीसह खोलीत गेला. दोघेही खोलीत इंटिमेट झाले. एवढ्यात तेथे दोन तरुणांनी प्रवेश केला.
- तेथे पोहोचलेल्या विवेकने तरुणीला आपली बहीण असल्याचे सांगितले. दुसरा खलीलला धमक्या देऊ लागला. आरोपींनी खलील याला त्याचा व्हिडिओ बनवल्याचे सांगितले. म्हणाले- आम्ही तुझ्या घरच्यांना सांगू आणि सोशल मीडियावरही व्हायरल करून टाकू.
- विवेकने स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगितले. म्हणाला- न्यूज तयार करून व्हायरल करून टाकीन आणि पोलिसांत रेपचा गुन्हाही दाखल करायला लावीन.
- तुला या सर्वापासून सुटका पाहिजे असेल तर 3 लाख रुपये आण. आरोपींनी नंतर दीड लाखात त्याच्याशी सौदा करून लवकर पैसे घेऊन यायला सांगितले. खलीलने त्यांना 60 हजार नेऊन दिले. उर्वरित पैसे देण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली, परंतु आरोपींना घाई होती. ते आधीच पैसे आणून देण्यासाठी मागे लागले.


झटपट बनायचे होते श्रीमंत
- आरोपी पॉश कॉलनीत अशा घटना घडवायचे. टोळीत सामील तरुणी आधी टारगेट हेरायच्या, त्याच्याशी मैत्री करायच्या. नंतर त्यांना घरात घेऊन यायच्या.
- तरुण घरी पोहोचताच त्या त्याच्याशी फिजिकल रिलेशन बनवायच्या. यादरम्यान टोळीतील इतर सदस्य व्हिडिओ बनवत होते. अचानक खोलीत येऊन धमकी द्यायचे.
- जाळ्यात अडकलेल्या तरुणांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळायचे. या ट्रिकने या टोळीने आतापर्यंत लाखो रुपये कमावले आहेत. लवकर श्रीमंत बनण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला होता.

 

हे आहेत आरोपी
- बिलासपूरचा विवेक चौधरी व त्याची पत्नी प्रिया, राजनांदगावची आकिया तौफिक खान, जवाहरनगरची सिमरन यादव आणि भिलाईचा सौरभ वर्मा अशी आरोपींची नावे आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बातमीशी संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...