आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मिडियावरील कॅम्पेनमुळे एका आठवड्यात दिल्लीतच सापडली हरवलेली जान्हवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : कुटुंबीयांबरोबर जान्हवी.
नवी दिल्ली - इंडिया गेट परिसरातून रविवारी बेपत्ता झालेती तीन वर्षीय जान्हवी एका आठवड्यानंतर रविवारी जनकपुरी आणि तिलकनगरदरम्यान सुरक्षित सापडली. जान्हवी जनकपुरी डी ब्लॉकजवळ लाजवंती गार्डन येथे सापडली. मुलीची ओळख लपवण्यासाठी तिचे केस पूर्णपणे काढून तिचे टक्कल करण्यात आले होते.
एका मुलाने फोनवरून जान्हवी सापडल्याची माहिती तिच्या आई वडिलांनी दिली होती. मुलगी मिळाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी मिडिया आणि सोशल मिडियाचे आभार मानले.
जान्हनी गेल्या रविवारी तिच्या आईवडिलांबरोबर इंडिया गेट येथे फिरण्यासाठी गेली तेव्हा हरवली होती. तिच्या तपासासाठी गुन्हे शाखा आणि विशेष शाखेची अनेक पथके प्रयत्न करत होते. तसेच सोशल मीडियामध्येही मोठ्या प्रमाणावर जाह्नवीच्या शोधासाठी कँपेन चालवण्यात आले होते. हजारो लोक यामध्ये सहभागी झाले होते.
गळ्यात आई वडिलांचे मोबाईल नंबर असणारी चिठ्ठी
ज्या मुलाला जान्हवी सापडली होती त्याने दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या गळ्यात एक चिठ्ठी लटकलेली होती. त्यावर मुलीचे नाव जान्हवी असे लिहिलेले होते. तसेच ती गेल्या आठवड्यात इंडिया गेट परिसरातून बेपत्ता झाली होती, याबरोबरच तिच्या आई वडिलांचे फोन नंबरही लिहिलेले होते. रात्री सुमारे सव्वा नऊ वाजता जान्हवीच्या आई वडिलांना फोन आला. त्यानंतर ते जनकपुरी डी ब्लॉकला पोहोचले. तोपर्यंत हा मुलगा मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याठिकाणी कायदेशीर कारवाई केली जात होती. रात्री उशीरा मुलीला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

मम्मी-पप्पा म्हणण्याचा आग्रह
आई वडिलांनी मुलगी भेटल्यानंतर पोलिस ठाण्यात तिला विचारणा केली. त्यावेळी ज्यांच्याकडे ही मुलगी होती, ते तिला मम्मी पप्पा म्हणण्यासाठी आग्रह करत होते असे या मुलीने सांगितले. पोलिसांनी मात्र अद्याप याबाबत काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या मुलीबाबत माहिती देणा-यांसाठी 50 हजार रुपयांची घोषणा केली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा सोशल मिडियामध्ये व्हायलर झालेले जान्हवीचे फोटो...