पुरी - ओडिशा पोलिसांनी ओएनजीसीच्या एका अभियंत्याच्या घरातून ३० मानवी कवट्या जप्त केल्या आहेत. त्यानंतर इंजिनिअर खिरेश्वर साहू उर्फ नुभाई यास अटक करण्यात आली. त्याच्या घरात १०० मानवी कवट्या असाव्यात, असा गावकऱ्यांचा अंदाज आहे.
साहू म्हणाले, माझे घर म्हणजे आश्रम नाही. मोटिव्हेशनल सेंटर आहे. आम्ही लोकांना भीती न बाळगण्याची प्रेरणा देतो. माझ्या घरी चोरीला येणाऱ्या लोकांना भीती घालण्यासाठी या कवट्या ठेवल्या आहेत. काही कवट्या स्मशानातून खरेदी केल्या आहेत, असा दावाही तो करतो. त्यापैकी काही कृत्रिम आहेत. त्या कटाकीपेंथा येथे राहणाऱ्या व्यक्तीने तयार केल्या आहेत. कवट्या जमा करणे गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे. पुरीमध्ये राहणारे साहू यांच्या आजूबाजूला पाच आश्रम आहेत; परंतु कवट्यांचा वापर तो जादूटोण्यासाठी करतो, असा लोकांचा संशय आहे. त्याचे वागणे संदिग्ध आहे.
ठकवणे माझा धर्म, जात माझी चोर...
साहूने घराच्या भिंतीवर उडिया भाषेत काही कविताही लिहिल्या आहेत. त्याचा अर्थ ‘मी लाकूड, मी दगड, मी भटकणारा कुत्रा, मी कपटी, मी कामुक, मी महाचोर. ठकवणे माझा धर्म, चोर माझी जात, माझे कोण, परके काेण मला नाही ठाऊक. ’