आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिमल्याजवळ पर्यटकांची बस नदीत कोसळल्याने 30 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिमला- हिमाचल प्रदेशात आज एका अपघातात 30 लोकांचा मृत्यू झाला. ही घटना कुलू-मनाली राष्ट्रीय महामार्गवर घडली. ही बस गच्च भरली होती. तसेच कुलूपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या झिरी गावाजवळ बस जात असताना नदीत कोसळली. ही बस कुलूवरून अनी येथे जात होती. पोलिसांच्या माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरुन थेट नदीत पडली.

घटनेची माहिती मिळताच मदतीचे काम सुरु करण्यात आले. अजूनही मदतकार्य सुरु आहे. आतापर्यंत 12 प्रवाशांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत. तसेच 15 लोकांना वाचविण्यात यश मिळाले. कुलूचे पोलिस उपायुक्त शरब नेगी यांनी सांगितले की, जखमी लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये एकून 50 जण पर्यटक प्रवास करीत होते. चालकाने उडी मारुन आपला जीव वाचविला.