आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईत १० कोटींंच्या नव्या नाेटा जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई | प्राप्तिकर विभागाने चेन्नईत केलेल्या धडक कारवाईत १० कोटींच्या नव्या नोटांसह १४२ कोटींची रोकड व १२७ ग्रॅम सोन्याच्या विटा जप्त केल्या. वाळू व्यवसायाशी संबंधित ग्रुपच्या आठ ठिकाणांवरील धाडीत हे घबाड हाती आले.
संबंधित ग्रुपला वाळू उपशाचा संपूर्ण तामिळनाडू राज्यासाठी परवाना आहे. आठ ठिकाणांमध्ये सहा निवासस्थाने व दोन कार्यालयांचा समावेश आहे. धाडीमध्ये जुन्या नोटांमध्ये ९६.८९ कोटी रु. आणि ९.६३ कोटींच्या नव्या दोन हजारांच्या नोटांमध्ये आढळून आले.

याशिवाय ३६.२९ कोटी रु. अंदाजित किंमतीचे बेहिशेबी १२७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले,अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. संपूर्ण मालमत्तेची अंदाजित किंमत १४२.८१ कोटी रुपये आहे. आठ पैकी चार ठिकाणांवर धाडसत्र अद्यापही सुरूच अाहे. दरम्यान, नव्या दोन हजारांच्या नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच व्यक्तीकडे कशा आल्या याचा तपास केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...