आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमधील शेतमजुरांना दरमहा मिळतो 30 हजार पगार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिरुवनंतपुरम- केरळमध्ये शेजमजुरी करणे आता क्षुल्लक काम राहिलेले नाही. तेथे महिला किंवा पुरुष शेतमजुराला दरमहा 30,000 रुपयांपर्यंत पगार मिळवणे आता शक्य झाले आहे.

तुमचा विश्वास बसो अगर न बसो, परंतु केरळमधील अनेक शेतमजूर राज्य सरकारच्या नव्या र्शमशक्ती योजनेमुळे महिन्याला चक्क पाच आकडी पगार खिशात घालू लागले आहेत. शेतमजुरांचा समाजातील दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सन्माननीय मजुरी मिळावी यासाठी केरळ सरकारच्या कृषी विभागाने ग्रामपंचायतींच्या सहकार्याने नवीन र्शमशक्ती योजना सुरू केली आहे. या योजनेमुळेच शेतमजुरीही आता रग्गड वेतन देणारा रोजगार ठरला आहे. या योजनेअंतर्गत इच्छुक शेतमजुराला स्थानिक कृषी भवनात जाऊन कृषिका कर्म सेनेच्या सदस्यत्वासाठी नाव नोंदणी करता येते. नाव नोंदणीनंतर त्याला कामाबरोबरच मासिक चांगल्या पगाराचीही हमी मिळते.

>200 ग्रामपंचायतींमध्ये आता ही योजना लागू करण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे.

मजुरीची रक्कम थेट बँक खात्यात
ज्या शेतकर्‍यांना त्यांच्या शेतावर कामासाठी शेतमजूर हवा असेल त्याला कृषिका कर्म सेनेकडून रोजंदारीवर शेतमजूर घेता येतो. त्यांची रोजंदारी पंचायत किंवा स्थानिक कृषी भवन अधिकार्‍यांकडून गोळा करण्यात येते आणि त्या शेतमजुराच्या बँक खात्यात जमा केली जाते.

स्त्री-पुरुष भेदभाव नाही
श्रमशक्ती योजनेत शेतमजुरीच्या बाबतीत स्त्री-पुरुष असा भेदभाव अजिबात केला जात नाही. दोघांनाही सारखीच मजुरी दिली जाते.

वर्षभर कामाची हमी
नव्या र्शमशक्ती योजनेअंतर्गत शेतमजुराच्या हाताला वर्षभर काम मिळेल आणि दर महिन्याला त्याला चांगला पगारही मिळेल, याची खबरदारी घेतली जाते.
- के. अजित कुमार, केरळचे कृषी संचालक

प्रत्येक गावात कृषिका कर्म सेना
या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात कृषिका कर्म सेना म्हणजेच शेतमजूर सेनेची स्थापना करण्यात आली असून त्या सेनेत शेतमजुरांची भरती करण्यात येते. त्यानंतर त्यांना शेतीचे जमिनीच्या मशागतीपासून पेरणी, निंदणी, कोळपणी आणि काढणीपर्यंतचे सर्व प्रकारचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना अत्याधुनिक हाय-टेक शेतीचेही प्रशिक्षण दिले जाते.
>60 खेड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू करण्यात आली आहे.
>30,000 रुपये अनेक शेतमजुरांना दरमहा पगार मिळू लागला आहे. कामाच्या तासावर वेतन असल्याने जेवढे अधिक काम तेवढा अधिक पगार मिळवणे आता शक्य झाले आहे.

अंगतोड मेहनतीचे झाले चीज
काम संपले की रोजंदारी देणे बंद

शेतमजुरांचे शेतावरील काम संपल्याबरोबर त्याच्या हातावर मजुरी ठेवण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यांच्या मजुरीची रक्कम कामाच्या तासांवर ठरवण्यात येते आणि महिनाअखेरीस गोळा झालेली रक्कम शेतमजुराला एकरकमी देण्यात येते. त्यामुळे केरळातील शेतमजूरही आता मासिक पगारदाराप्रमाणेच पगार घेऊ लागले आहेत.